फॅक्ट्री कामगारापेक्षाही त्याचा पगार कमी; यामुळे बनला कोट्यवधी रूपयांचा मालक

मामाने दिली भाच्याला साथ; मनात इच्छा असेल तर मार्ग सापडतो...

Updated: Sep 25, 2021, 10:44 AM IST
फॅक्ट्री कामगारापेक्षाही त्याचा पगार कमी; यामुळे बनला कोट्यवधी रूपयांचा मालक title=

मुंबई : मनात इच्छा असेल तर मार्ग सापडतो... असं आपण अनेकदा ऐकलं आहे. पण ऐकलेलं सत्यात उतरवण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये असते. आज प्रत्येकाला माहिती आहे की, नोकरी केल्यामुळे आपण आपलं स्वप्न पूर्ण कधीचं करू शकत नाही. त्यासाठी व्यावसाय हा पहीला आणि शेवटचा पर्याय आहे. सूरतमध्ये राहाणाऱ्या एका युवकाने अत्यंत कमी पगाराची नोकरी असल्यामुळे सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज तो व्यक्ती कोट्यवधी रूपयांचा मालक आहे. 
 
फ्रॉक्ट्री कामगाराची नोकरी सोडल्यानंतर सूरतच्या कृणाल  रैयाणीने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आज क्रुणाल 10 कोटी रूपयांचा मालक आहेत. त्यांना मिळालेलं हे यश फक्त त्यांच्या जिद्दीच्या जोरावर आहे. सामान्य कुटुंबातील असल्यामुळे आर्थिक चणचण, त्यामध्ये स्वतःचा व्यावसाय कसा सुरू करायाचा? असा मोठा प्रश्न कृणाल  यांच्या समोर होता.
 
सामान्य कुटुंबातील असल्यामुळे कोणी मदतीसाठी पुढे येत नव्हतं. अशा कठीण प्रसंगी कृणालच्या मामांनी भाच्याची साथ सोडली नाही. मामांनी त्यांच्या भाच्याला 2 लाख रूपये दिले. त्यानंतर या भाच्याने मामाने दिलेल्या 2 लाख रूपयांचे रूपांतर कोट्यवधी रूपयांमध्ये केले. आज कृणाल यांच्या कंपनामध्ये जवळपास 101 कामगार काम करतात. 

कृणाल यांच्या कंपनीने शेकडो लोकांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. त्यांची 'कंपनी मेक इन इंडिया', 'व्होकल फॉर लोकल' सारख्या विषयांवर वेगाने काम करत आहे. कृणालच्या कंपनीचे दरवाजे प्रतिभावानांसाठी खुले आहेत. आज त्यांच्या कंपनीची देशातील अनेक राज्यांमध्ये गोदामे आहेत. त्याच्या कंपनीने बनवलेले कपडे परदेशात पुरवले जातात.