video viral : भलामोठा गेंडा जीपमागे अतिप्रचंड वेगानं धावू लागला आणि...

video viral : वाचवाssss; एकशिंगी गेंड्याची सटकली, त्याचा वेग पाहून जीपमध्ये बसलेल्यांना फुटला घाम. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल. जंगल सफारीला जाण्याआधी हा व्हिडीओ पाहाच 

Updated: Dec 31, 2022, 10:46 AM IST
video viral : भलामोठा गेंडा जीपमागे अतिप्रचंड वेगानं धावू लागला आणि...  title=
trending news One horned rhinoceros chased tourist vehicle in Manas National Park Assam video viral

Video Viral: निसर्गाची (Nature) किमया पाहायची असेल, तर प्राणीमात्रांहून उत्तम उदाहरण नाही. निसर्गाच्या चक्रात आपलं अस्तित्वं टिकवून ठेवणाऱ्या या प्राणांकडे पाहताना सर्वांनाच कुतूहल वाटतं. हेच कुतूहल पाहण्यासाठी अनेकजण थेट जंगल सफारीचा (Jungle Safari) आनंद घेण्यासाठी निघतात. या सफारीवर निघालं असताना प्रत्येकालाच वन्य प्राणी (Wild Animals) दिसतीच असं नाही. त्यातही तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला दुर्मिळ प्राणी अगजी सहपणे पाहता येतील. हो, पण प्राणी नजरेस पडो अथवा न पडो हा अनुभव कायम लक्षात राहील असाच असेल. (trending news One horned rhinoceros chased tourist vehicle in Manas National Park Assam video viral)

गुवाहाटी (Guwahati) येथील (Manas national park) मानस नॅशनल पार्क येथे गेलेल्या काही पर्यटकांनी हाच अनुभव घेण्याचं ठरवलं. ते यासाठी जंगलाच्या वाटेवर गेलेसुद्धा. पण, पुढे त्यांच्यासोबत जे घडलं ते पाहून त्यांनी तिथून धूम ठोकली. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या मानस नॅशनल पार्क येथील वन्यजीवन पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक येत असतात. अशाच काही पर्यटकांना इथं अनपेक्षित प्रसंगाचा सामना करावा लागला. 

घटनेनं उडाला थरकाप... 

त्याचं झालं असं, की काही पर्यटक इथं जंगल सफारीसाठी गेले होते. त्याचवेळी अचानकच त्यांना एकशिंगी गेंडा दिसला. या अवाढव्य प्राणाला पाहून जीपमध्ये असणारी मंडळी अवाक् झाली. पण, पुढच्याच क्षणाला त्यांना घाम फुटला. कारण, तो गेंडा चिडला आणि मोठ्या आवेगात जीपच्या मागे धावू लागला. शरीराता इतका भार घेऊन वेगानं धावणाऱ्या या प्राण्याला पाहिल्यानंतर जिपमध्ये असणाऱ्यांच्या किंकाळ्या सुरु झाल्या. 

हेसुद्धा वाचा : New Year 2023 : मोदी सरकारचे सर्वसामान्यांना New Year गिफ्ट; गुंतवणूकदारांसाठी केली मोठी घोषणा!

 

सदर घटनेचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यानंतर मानस नॅशनल पार्कमधील वन अधिकारी बाबुल ब्रह्मा यांनी ही घटना डिसेंबर महिन्यातीच असल्याचं म्हणत यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकजण शेअर करत असून, त्यावर तितक्याच प्रतिक्रियाही येत आहेत. 

गेंडा ताशी किती किमी वेगानं धावू शकतो? 

गेंडा हा प्राणी सहासा एकटा राहतो. पण, अनेकदा लहान गटांमध्येही तो वावरतो. जलस्त्रोत, चिखल अशा भागांमध्ये तो निवांत वावरताना दिसतो. तुम्ही जाणून हैराण व्हाल पण इतकं वजन असूनही गेंडे उत्तमरित्या पोहतात आणि प्रचंड वेगानं धावतातसुद्धा. ताशी 45 ते 48 किमी वेगानं गेंडा धावतो. पण, हे तेव्हाच होतं ज्यावेळी तो चिडतो. माणसांपासून दूर असणारा गेंडा स्वत:ला धोका जाणवल्यास जबर हल्लाही करु शकतो. या प्राण्याचं आयुर्मान साधारण 50 वर्षे इतकं आहे.