ऐन लग्नाच्या दिवशी बॉसने केला असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, नवरी मुलगी मंडपातच कोसळली

Trending News : मुहूर्त ठरला, लग्नाची तयारी पूर्ण झाली, नवरी मुलगी सजली... पण त्याचवेळी तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि तो मेसेज वाचून मुलगी लग्न मंडपातच कोसळली. या घटनेने एकच खळबळ उडाली.

राजीव कासले | Updated: May 31, 2024, 05:26 PM IST
ऐन लग्नाच्या दिवशी बॉसने केला असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, नवरी मुलगी मंडपातच कोसळली title=

Trending News : ऐन लग्नाच्या दिवशी व्हॉट्सअॅपवर आलेल्या एका मेसेजने नवऱ्या मुलीला मोठा धक्का बसला. हा मेसेज ती काम करत असलेल्या कंपनीच्या बॉसने पाठवला होता. हा मेसेज वाचला आणि मुलगी जागेवरच कोसळली. यामुळे एकच खळबळ उडाली. मुहूर्त ठरला, लग्नाची तयारी पूर्ण झाली, नवरी मुलगी सजली... पण त्याचवेळी तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. या मेसेजने तिच्या आयुष्यात वादळ उभं राहिलं.

काय आहे नेमकी घटना?
का नोकरदार तरुणीचं लग्न ठरलं होतं. लग्नासाठी काही दिवस सुट्टी घेऊन ही तरुणी तयारीला लागली. ठरलेल्या दिवशी लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली. कुटुंबिय, नातेवाईक सर्वच आनंदात होते आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या सोहळ्याचा उत्साह झळकत होता. पण नवऱ्या मुलीसह या सर्वांच्या उत्साहावर एका मेसेजने विरजण पडलं. लग्नासाठी मुलगी तयार होत होती. त्यावेळी सहज म्हणून तीने आपला मोबाईल तपासला. मोबाईलवर ती काम करत असलेल्या कंपनीच्या बॉसचा एक मेसेज आला होता. 

वाचवण्यासाठी त्या मुलीने तो मेसेज उघडला आणि तिला धक्काच बसला. ऐन लग्नाच्या दिवशीच त्या तरुणीला बॉसने कामावरुन काढून टाकल्याचा मेसेज केला होता. मेसेजमध्ये बॉसने तुला आज आणि या क्षणापासून नोकरीवरुन काढून टाकत असल्याचं लिहिलं होतं. 

तरुणीने यूट्यूबरच्या The Ben Askins Show या कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील त्या कटू आठवणी सांगितल्या. लग्न होत असल्याने मी प्रचंड खूश होते, पण त्या एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. तो मेसेज माझ्या बॉसचचा होता असं या तरुणीने सांगितलं.

बॉसचा कठोर निर्णय
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार लग्न करत असल्याचा तीने रितसर सुट्टीचा ईमेल केला होता, तसंच ऑफिसमध्येही सर्वांना आपण लग्न करणार आहे हे माहित होतं. पण बॉसने नेमकं लग्नाच्या दिवशी कामावरुन काढून टाकल्याचा मेसेज केला. यात त्याने लिहिलं होतं 'अपेक्षा करतो की तू लग्न एन्जॉय करत असशील, कंपनीत तूझी वर्तणूक चांगली होती, पण आता कंपनीने तुला नोकरीवरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण माहिती तुझ्या वैयक्तिक ई-मेलवर पाठवण्यात आल्याचं या मेसेजमध्ये लिहिलं होतं.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरुनही हटवलं
तरुणीने तात्काळ आपला ई-मेल तपासला. त्यावर नोकरीवरुन काढून टाकल्याचा ई-मेल पाठवण्यात आला होता. या ईमेलमध्ये कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचं लिहिण्यात आलं होतं. इतकंच नाही तर तिला त्याच दिवशी कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरुनही काढून टाकण्यात आलं होतं. याआधी कंपनीने कधीच आपल्या कामाबद्दल तक्रार केली नव्हती असं स्पष्टीकरण तरुणीने दिलं.