Traffic Challan on Sleepers : देशात बाईक किंवा कार चालवण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आलंय. रस्ते वाहतुकीदरम्यान अपघात कमी करण्यासाठी बाइक आणि कार चालवताना वाहनधारकाने कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे वाहतूक नियमात सांगण्यात आलंय. मोटार वाहन कायद्यांतर्गत अनेक नियमांचे पालन न केल्यास आपल्याला मोठा दंड (Traffic Challan) बसतो. आजकाल ई चालानेद्वारे दिवसभरात गाडी चालवताना रस्ते वाहतुकीचे नियमच उल्लंघन केल्यास चालान आपल्या येतं. टुव्हील म्हणजे दुचाकी धारकांना हेल्मेटची सक्ती करण्यात आलीय. पण जर तुम्ही चप्पल किंवा लुंगी घालून बाइक चालवल्यास दंड पडतो असं बातम्या समोर येत असतात. काय आहे यामागील सत्य खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितलंय.
खरं तर, जर तुम्ही चप्पल घालून बाइकवरून रस्त्यावर निघालात तर ते तुमच्यासाठी जीवावर बेतू शकतं. बाइक चालवताना चप्पल ही सोयीस्कर नसते. तुमचा चप्पलमुळे पाय घसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुचाकी चालवताना शूज घालण्याचा प्रयत्न करावा असं सांगितल जात. चप्पल घातल्याने दुखापत होण्याची शक्यता वाढते आणि गीअर शिफ्ट करण्यातही अडचण येऊ शकते.
आम्ही तुम्हाला सांगतो की मोटार वाहन कायद्यात चप्पल किंवा सँडल घालून दुचाकी किंवा कार चालवू नये अशी कोणतीही तरतूद नाही. कायद्यात असा कोणताही नियम सांगण्यात आलेला नाही. त्यामुळे चप्पल घालून कार किंवा दुचाकी चालवल्यास दंड बसणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितलं की, चप्पल घालून दुचाकी चालवल्यास किंवा कमी कपडे घालून स्कूटर चालवल्यास दंड बसत नाही. चप्पल, हाफ स्लीव्ह शर्ट, लुंगी बनियान घालून गाडी चालवणे, गाडीची काच अस्वच्छ असणे किंवा गाडीत अतिरिक्त बल्ब न ठेवणे यासाठी चालनाची तरतूद नाही. अशा अफवांपासून सावध राहा, असे या पोस्टसोबत सांगण्यात आलंय.
अफवाहों से सावधान...!#TrafficFines #MotorVehicleAct pic.twitter.com/vd2gLu72i3
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) September 25, 2019
खरं तर बाइक किंवा कार चालवताना शूज घालून चालवल्यास रेस किंवा ब्रेक पेडलवर मजबूत पकड मिळते. चप्पलवर ती पकड मिळत नाही शिवाय पाय घसरण्याची शक्यता अधिक असते. खास करुन पावसाळ्यात ओली चप्पल ही धोकादायक ठरु शकते. त्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.