Raped On Minior Girl And Goat: उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथून एक घृणास्पद घटना घडली आहे. एका सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीने 10 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केला. इतकंच नव्हे तर त्यानंतर बकरीवरही अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 57 वर्षांचा आरोपी शिकारपूर ब्लॉक येथे ADO कृषी (सहायक विकास अधिकारी कृषी) म्हणून कार्यरत आहेत.
या घटनेबद्दल अधिक माहिती देताना एसएसपी श्लोक कुमार यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास गजेंद्र सिंह नावाचा एक व्यक्ती त्याच्या एका नातेवाईकाकडे गेला होता. तिथे पहिले त्याने एका 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पण इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीने आणखी एक घृणास्पद काम केले आहे. घराजवळच बांधलेल्या एका बकरीवर त्याने अनैसर्गिक अत्याचार केला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ बनवला होता. आरोपीविरोधात तक्रार दाखल करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कोर्टात सादर केल्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडितेचे वडिल यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई केली आहे. आरोपीविरोधात बलात्कार, पॉक्सो अॅक्ट, एससी एसटी अॅक्ट, पशुक्रुरता याकलमांतर्गंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. प्रशासनाच्या मदतीने त्यांना आर्थिक सहाय्य आणि त्याचबरोबर त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त एसएसपीने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण स्पीड ट्रायल कोर्टात चालवण्यात यावे, अशी शिफारस केली आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी, याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसंच, हा आरोपी सरकारी कर्मचारी होता. त्यामुळं त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.