व्यापारी संघटनांकडून देशव्यापी बंदची हाक, GST च्या नव्या निर्णयाला विरोध

 पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळी अशा आणखी काही पदार्थांवर 18 जुलैपासून जीएसटी लागू होणार  

Updated: Jul 16, 2022, 11:13 AM IST
व्यापारी संघटनांकडून देशव्यापी बंदची हाक, GST च्या नव्या निर्णयाला विरोध title=

मुंबई : जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळी अशा आणखी काही पदार्थांवर 18 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. 

व्यापारी संघटनांनी त्याचा निषेध केला. त्यासाठी आज एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळण्यात येणार आहे. जीएसटी लागू होताच अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. धान्य आणि डाळींच्या किमती 8 ते 10 टक्क्यांनी वाढतील असं व्यापा-यांचं म्हणणं आहे. 

महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे. आधीच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचं मूल्य घसरत आहे. 

वाढत्या महागाईत आता आणखी एक जाळ निघणार म्हणजे GST च्या स्लॅबमध्ये बदल करण्यात आल्याने आता अनेक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापारी दोघांनाही बसणार आहे.