Torque Motors | दमदार ई-बाईकची भारतीय बाजारात एन्ट्री; अखेर प्रतिक्षा संपली

Torque Motors ने भारतात नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल Kratos लाँच केली आहे. दिल्लीत या ई-बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.02 लाख रुपये आहे

Updated: Jan 27, 2022, 11:36 AM IST
Torque Motors | दमदार ई-बाईकची भारतीय बाजारात एन्ट्री; अखेर प्रतिक्षा संपली title=

 मुंबई : Torque Motors ने भारतात नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल Kratos लाँच केली आहे. दिल्लीत या ई-बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.02 लाख रुपये आहे. कंपनीने ही बाईक दोन प्रकारात उपलब्ध केली आहे - Kratos आणि Kratos R. इच्छुक ग्राहक 999 रुपयांच्या टोकन रकमेसह कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकतात. मार्च 2022 पासून ग्राहकांना टॉर्क क्रॅटोसची डिलिव्हरी मिळणे सुरू होईल. कंपनी देशभरात इलेक्ट्रिक वाहनांची अनेक टप्प्यांत विक्री सुरू करणार आहे.

एका पूर्ण चार्जवर 120km रेंजचा दावा
बाईकची विक्री पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये सुरू करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात या शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये विक्री वाढवण्यात येणार आहे. टॉर्क क्रॅटोस 48V सिस्टम व्होल्टेजसह IP67-रेट केलेल्या 4 kWh लिथियम-आयन बॅटरीशी जोडलेले आहे. IDC च्या मते, बाईक 120 किमीपर्यंत धावू शकते. बाईकचा टॉप स्पीड 100 किमी/तास आहे.

0-40 किमी/ताशी फक्त 4 सेकंदात
Kratos ला वेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक मोटर मिळते जी 7.5 kW पॉवर आणि 28 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यामुळेच ही बाईक अवघ्या 4 सेकंदात 0-40 किमी/ताशी वेग पकडू शकते. 

Kratos R ची इलेक्ट्रिक पावर 9 kW पॉवर आणि 38 Nm पीक टॉर्क जनरेट करते. बाईकचा 

Tork Cratos, Cratos Electric Bike, Electric Motorcycle, Tork Motors,