वृद्ध आई-वडिलांसाठी लेकाने केलं असं काही...सोशल मीडियावर Video वेधतोय सगळ्यांचं लक्ष...

आजच्या युगातही जिथे आई-वडिलांना वृद्ध आश्रमात ठेवाणारे मुलं असताना या श्रावण बाळाची सगळीकडे चर्चा आहे. 

Updated: Jul 23, 2022, 10:30 PM IST
वृद्ध आई-वडिलांसाठी लेकाने केलं असं काही...सोशल मीडियावर Video वेधतोय सगळ्यांचं लक्ष... title=

Viral Video : लहानपणी आपण सगळ्यांनी श्रावण बाळाची कथा ऐकली आहे. अंध आी-वडिलांना कावडीत बसवून तिर्थयात्रेला हा श्रावण बाळ घेऊन जातो. पण आजच्या आधुनिक युगात असा श्रावण बाळ असू शकतो का? असा श्रावण बाळ तुम्ही कुठे पाहिला आहे का? सोशल मीडियावर सध्या आधुनिक युगातील श्रावण बाळ चर्चेचा विषय झाला आहे. आजच्या युगातही जिथे आई-वडिलांना वृद्ध आश्रमात ठेवाणारे मुलं असताना या श्रावण बाळाची सगळीकडे चर्चा आहे. 

नुकतीच उत्तर प्रदेशात कावड यात्रेला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात आणि हिंदी भाषिक राज्यांमध्ये कांवर यात्रा या नावानेही ती प्रसिद्ध आहे. कावड हे तराजूसारखा आकाराचं असतं. या यात्रेत कावडीतून गंगाजल आणायचं आणि त्याने महादेवाला अभिषेक करायचा. या यात्रेला मोठ्या संख्येने उत्तरेकडील भाविक गर्दी करतात. गावागावातून अनेक भाविक या यात्रेत महादेवाला अभिषेक करण्यासाठी येतात. याच यात्रेत एक श्रावण बाळ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

या यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या कावडीला दोन्ही बाजूंना पाण्याचे हंडे ठेवलेले दिसतात. पण या व्हिडीओमधील आधुनिक श्रावण बाळाच्या कावडी एका बाजूला वृद्ध आई आणि दुसऱ्या बाजूला वडील बसलेले दिसतात. झालं असं की, या वृद्ध आणि थकलेल्या आईवडिलांची कवाड यात्रेत सहभागी होण्याची इच्छा असते. पण येवढी मोठी यात्रा आता या वयात त्यांना शक्य नव्हती. मग मुलाने त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांसाठी हा मुलगा श्रावण बाळ झाला. कवाड यात्रेत भाविकांनी पाण्याचे हंडे आणले होते, पण या लेकाने आईवडिलांना आणलं होतं. आईवडिलांनी या लेकांने कावडीतून बसवून यात्रा घडवून आणण्याचा पुढाकार घेतला आहे. 

हा व्हिडीओ अशोक कुमार आयपीएस अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या ट्विटरवर या प्लेटफॉर्मवर शेअर केला आहे. आजच्या युगाच  मुलांना आईवडिलांचं ओझ वाटतं. अशा युगात हा श्रावण बाळ आईवडिलांचं ओझे खांद्यावर उचलून त्यांना यात्रा घडवून आणत आहे. या युगातील प्रत्येक मुलासाठी हा श्रावण बाळ एक आदर्श ठरला आहे. या श्रावण बाळाचा सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.