दिलासा! सोने- चांदीचे दर घसरले; सर्वात कमी दरात कसं कराल खरेदी?

सवलतीच्या दरानं सोन्यात गुंतवणूकीची संधी 

Updated: Jul 8, 2020, 03:51 PM IST
दिलासा! सोने- चांदीचे दर घसरले; सर्वात कमी दरात कसं कराल खरेदी? title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : बऱ्या काळापासून सराफा बाजारामध्ये Gold सोने आणि Silver चांदीच्या Rates दरांमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. पण, बुधवारी मात्र सोन्याच्या दरांमध्ये कपात झाल्याचं निदर्शनास आलं. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)मध्ये सोन्याचे दर जवळपास १४८.०० रुपयांनी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. परिणामी हे दर प्रतितोळा ४८,६५२ वर पोहोचले. 

५० हजारांच्या घरात पोहोचलेल्या सोन्याच्या दरांमध्ये घट झाल्यामुळं (MCX) वर ४८,७०४ रुपये प्रति दहा ग्रॅम अशी किंमत सोन्याला मिळाली. झी बिजनेसच्या वृत्तानुसार (MCX) वर चांदीचे दरही १७२ रुपयांनी कमी झाल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळं प्रति किलो चांदीचे दर ५००३० रुपयांवर पोहोचले. 

सवलतीच्या दरानं सोन्यात गुंतवणूक करा 

सोन्यामध्ये गुंतवणूक करु इच्छिणाऱ्यांना १० जुलैपर्यंत स्वस्त, सवलतीच्या दरात गुंतवणूक करण्याची संधी आहे. शासनाकडून सॉवरेन गोल्ड बॉण्डअंतर्गत या व्रिकीची सुरुवात ६ जुलैपासून केली आहे. बॉण्ड विक्री योजनेचं हे चौथं सत्र आहे. स्वस्त दरांत गुंतवणूक करुन तुम्हाला यातून परतावाही मिळू शकतो. 

ऑनलाईन सोनं खरेदीवर सवलत 

सदर योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाईन सोन्याची खरेदी करत असाल, तर तुम्हाला सोन्याच्या दरांत सवलतही मिळणार आहे. ऑनलाईन अप्लाय आणि पेमेंट करणाऱ्यांना प्रति ग्राम ५० रुपयांची सूट दिली जाणार आहे. खासगी बँक, भारतीय स्टॉक होल्डिंग निगम लिमिटेड, काही निवडक पोस्ट ऑफिस, मान्यताप्राप्त शेअर बाजार जसे एनएसई आणि बीएसईमार्फक सॉवरेन गोल्ड बॉण्डची खरेदी करता येऊ शकते. 

 

येत्या दिवसांत दरांत तेजी 

India Bullion and Jewellers Association (IBJA)चे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या म्हणण्यानुसार coronavirus कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कोसळल्यामुळं सोन्याच्या दरांत तेजी पाहायला मिळत आहे. मोठे गुंतवणुकदार त्यांचा जास्ती जास्त पैसा सोन्यात गुंतवत आहेत. शिवाय जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळं त्याचेही थेट परिणाम सोन्याच्या दरांमध्ये दिसू लागले आहेत.