Petrol-Diesel च्या नव्या किमती जाहीर, पाहा आजचे दर

भारतीय तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) नव्या किमती जाहीर केल्या आहेत. आज 98 दिवसांनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर (Diesel)...

Updated: Aug 18, 2022, 10:58 AM IST
Petrol-Diesel च्या नव्या किमती जाहीर, पाहा आजचे दर  title=
Petrol-Diesel price: भारतीय तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) नव्या किमती जाहीर केल्या आहेत. आज 98 दिवसांनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर (Diesel) स्थिर आहेत. तर दुसरीकडे आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 88 डॉलर्सच्या खाली घसरले आहेत. WTI क्रूड प्रति बॅरल 87.83 डॉलरवर व्यापार करत आहे. ब्रेंट क्रूडची खरेदी प्रति बॅरल 93.49 डॉलर या दरानं होत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये आहे. 
 
आजचे कच्च्या तेलाचे दर काय?  
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. 
 
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
 
महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
 
शहर पेट्रोलच्या किमती डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे 105 92
नागपूर 106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे 106.05 92.58 
नांदेड 108.24 94.71
रायगड 105.96 92.47
अकोला 106.05 92.55
वर्धा 106.56 93.10
नंदुरबार 106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली 105.96 92.54
जालना 107.76 94.22
 
पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
 
इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
 
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
 
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.