Share Market Opening : शेअर बाजाराची आज (18 ऑगस्ट) घसरणीने सुरुवात झाली. शेअर बाजाराची सुरू होताच सेन्सेक्स 150 अंकांची घसरण दिसून आली होती. तर, निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 56 अंकांच्या घसरणीसह 17,888.20 अंकांवर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्स 206 अंकांच्या घसरणीसह 60,053.71 अंकांवर व्यवहार करत होता.
आठवड्याच्या सुरवतीपासून शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली होती. पण बुधवारी सलग सातव्या दिवशी बाजार तेजीत बंद झाला. सेन्सेक्स 418 अंकांनी वाढून 60260 वर बंद झाला आणि निफ्टी 119 वर चढून 17944 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 222 अंकांनी वाढून 39462 वर बंद झाला. तर मिडकॅप 147 अंकांनी वाढून 31,401 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
जागतिक बाजारपेठेतील वाढ, विशेषत: अमेरिकन बाजार आणि अनुकूल देशांतर्गत ट्रिगर्समुळे बाजारात तेजी दिसून आल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. परकीय गुंतवणूकदारांचे कमबॅक झाल्याने बाजारात चांगले वातावरण होते. विकली एक्सपायरीच्या दिवशी अर्थात आज बाजारात काहीशी अस्थिरता असू शकते.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
बजाज फायनान्स (BAJFINANCE)
भारती एअरटेल (BHARTIARTL)
झी एंटरटेनमेंट लिमिटेड (ZEEL)
ट्रेंट (TRENT)
एल अँड टी (LTTS)
हिंदूस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
डिक्सन (DIXON)