Petrol Diesel चे दर 'जैसे थेच'; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र दुसरीकडे...

Updated: Aug 22, 2022, 09:25 AM IST
Petrol Diesel चे दर 'जैसे थेच'; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर title=

Petrol-Diesel Price :  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहे. 

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर - पेट्रोलच्या किमती - डिझेलच्या किमती

मुंबई 106.25 94.22

पुणे  105       92

नागपूर  106.03 92.58

नाशिक 106.74 93.23

हिंगोली 107.29 93.80

परभणी 108.92 95.30

धुळे  106.05 92.58

नांदेड  108.24 94.71

रायगड  105.96 92.47

अकोला  106.05 92.55

वर्धा  106.56 93.10

नंदुरबार  106.99 93.45

वाशिम 106. 37 93.37

चंद्रपूर 106.14 92.70

सांगली  105.96 92.54

जालना 107.76  94.22

दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर पाहता येतील. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती SMS वर कळू शकतात. दरम्यान RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.