Petrol-Diesel Price Today 29th October : महिनाभरापूर्वी विक्रमी पातळीवर गेलेल्या कच्च्या तेलाच्या (crude oil) किमती आता गडगडल्या आहेत. कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मात्र, देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान घसरणीनंतरही क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 90 च्या वरच आहे. (today petrol diesel latest price on 29 october 2022 in mumbai )
पाच महिन्यांहून अधिक काळ दर स्थिर
देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel rate) दर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ समान पातळीवर आहेत. शनिवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 87.46 वर घसरल्याचे दिसले. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 95.29 पर्यंत घसरले. ओपेक देशांनी उत्पादनात कपात केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमती वाढल्या आहेत.
22 मे रोजी शेवटचे बदलले दर
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कच्चे तेल विक्रमी पातळीवर आले. पण त्यावेळीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel rate) दरात कोणताही बदल झालेला दिसला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
त्यावेळी सरकारने उत्पादन शुल्क कमी केले होते. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यानंतर महाराष्ट्रात तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला, त्यामुळे किंमती खाली आल्या.
शहर आणि तेलाच्या किमती (Petrol-Diesel Price on 29th october)
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.96 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर सकाळी 6 वाजता दररोज तेलाचे दर जाहीर होतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यास, राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे राहत नाहीत.