Tiktok Layoffs: एक Call आला आणि....; टिक टॉककडून भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना नारळ; चीननं राग काढला?

Tiktok Layoffs: 2022 या वर्षाच्या अखेरीस अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातीलही काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला होता.   

Updated: Feb 10, 2023, 01:19 PM IST
Tiktok Layoffs: एक Call आला आणि....; टिक टॉककडून भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना नारळ; चीननं राग काढला?  title=
Tiktok Layoffs company sends whole india staff home latest Marathi news

Tiktok Layoffs: आर्थिक मंदीचं (Recession) कारण देत गेल्या वर्षापासून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या फरकानं कपात केली. अनेकांनी यामध्ये नोकऱ्या गमावल्या. त्यातच आता आणखी बऱ्याचजणांची भर पडणार आहे. कारण, शॉर्ट व्हिडीओ अॅप अशी ओळख असणाऱ्या Tiktok अॅपकडूनही मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला या कंपनीकडून सर्वच भारतीय कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर, 40 जणांना पिंक स्लीप देण्यात आला आहे. सोमवारी एका Call द्वारे कंपनीनं हे पाऊल उचललं. 

कर्मचाऱ्यांना पुढील 9  महिन्यांचा पगार देण्यात येईल असं सांगत त्यांना कामावरून काढण्यात आलं. टिक टॉक इंडियाच्या (Tiktok India news) कर्मचाऱ्यांना 28 फेब्रुवारी हा त्यांच्या कामाचा अखेरचा दिवस असेल असंही सांगण्यात आलं. शिवाय त्यांना इतर पर्याय शोधण्यासाठी फिलर्सही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

भारतीय कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य का केलं गेलं? 

भारत सरकारकडून 2020 या वर्षात साधारण 300 चिनी अॅप्सवर राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या क्षणापासून भारतात कधीच हे अॅप्स रिलाँच झाले नाहीत. टीकटॉकही त्यात समाविष्ट होतं. किंबहुना हे अॅप येत्या काळात सुरु होईल अशी आशाही नाही असं कंपनीकडूनच स्पष्ट करण्यात आलं. याच परिस्थितीमध्ये भारतातील कर्मचाऱ्यांना नारळ दिला गेल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : Meta Layoffs: मार्क झुकरबर्गचा वरिष्ठ Managers ला शेवटचा इशारा; म्हणाला, "कंपनीसाठी योगदान द्या नाहीतर..."

 

भारतात हे चिनी अॅप बंद झाल्यानंतर बहुतांश कर्मचारी दुबई आणि ब्राझीलमधून काम करत होते. भारतात टिकटॉक बंद झालं, त्यावेळी या अॅपचे एकूण 200 मिलियनहूनही अधिक युजर्स होते. चीनही भारताला परदेशी बाजारांपैकी एक मोठा भागीदार समजलं होतं. पण, परिस्थिती बदलत गेली. पुढे इन्स्टाग्रामकडून तत्सम फिचर लाँच करत इन्स्टा रील्सचा ट्रेंड वाढला. 

आतापर्यंत कोणत्या भारतीय स्टार्टअप आणि आयटी कंपनीनं काढले किती कर्मचारी? 

BYJU’s – 1500 कर्मचारी 
Wipro –  450 कर्मचारी
InMobi – 70 कर्मचारी
GoMechanic –  770 कर्मचारी
DealShare – 770 कर्मचारी
Medi Buddy – 200 कर्मचारी
Extol – 142 कर्मचारी
Coindex – 90 कर्मचारी
Ola – 200 कर्मचारी