बामणपुरा येथे इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू

गुजरात वडोदराच्या बामणपुरा येथे काल रात्री उशिरा बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला.  

Updated: Sep 29, 2020, 06:42 AM IST
बामणपुरा येथे इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू  title=
Pic Courtesy: ANI

अहमदाबाद : गुजरात वडोदराच्या बामणपुरा येथे काल रात्री उशिरा बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. अद्याप बचाव कार्य सुरु आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

दुर्घटनाग्रस्ता इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याने बचाव कार्य सुरुच आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत ३० वर्ष जुनी होती आणि सध्या इमारतीची डागडुजी सुरु होती.