Personal Loan घेण्यापेक्षा हे पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी

दैनंदिन जीवनात अडचणी आल्या की लोन घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पाठचा पुढचा कसलाही विचार न करता गरज डोळ्यासमोर ठेवून हा पर्याय निवडला जातो. कारण पर्सनल लोन सहज मिळतं. पण एकदा पर्सनल लोन (Personal Loan) घेतलं की ते भरताना चांगलीच दमछाक होते. पर्सनल लोनवरील व्याजदरही (Personal Loan EMI) इतर कर्जांच्या तुलनेत जास्त असते.

Updated: Nov 15, 2022, 09:05 PM IST
Personal Loan घेण्यापेक्षा हे पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी title=

These Are Better Option Than Personal Loan Know About It: दैनंदिन जीवनात अडचणी आल्या की लोन घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पाठचा पुढचा कसलाही विचार न करता गरज डोळ्यासमोर ठेवून हा पर्याय निवडला जातो. कारण पर्सनल लोन सहज मिळतं. पण एकदा पर्सनल लोन (Personal Loan) घेतलं की ते भरताना चांगलीच दमछाक होते. पर्सनल लोनवरील व्याजदरही (Personal Loan EMI) इतर कर्जांच्या तुलनेत जास्त असते. तुम्हालाही कधी पर्सनल लोन घेण्याची आवश्यकता भासली तर काही पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यामुळे तुमची गरजही पूर्ण होईल आणि ईएमआय देखील कमी द्यावा लागेल. एफडी लोन, गोल्ड लोन, पीपीएफ लोन, प्रॉपर्टी मॉर्गेज लोन हे चांगले पर्याय ठरतील. 

एफडी कर्ज (FD Loan)- तुम्ही कोणत्याही बँकेत एफडी केली असेल, तर तुम्ही त्या एफडीवर कर्ज घेऊ शकता. तुम्हाला एफडीवर एकूण खर्चाच्या 90 ते 95 टक्के पर्यंत रक्कम मिळू शकते. एफडीची रक्कम कर्जावर तारण म्हणून जमा केली जाते. एफडीवर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फी भरावी लागत नाही. त्याचा व्याजदर तुम्हाला तुमच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 1 ते 2 टक्के जास्त असतो. पण पर्सनल लोनपेक्षा नक्कीच कमी आहे.

गोल्‍ड लोन (Gold Loan)- सोन्यावरही कर्ज घेता येते आणि सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येतं. सोनं तारण ठेवून त्या मोबदल्यात बँकेकडून कर्ज घेता. गोल्ड लोनवरील व्याज दर 7% पासून सुरू होतो. पर्सनल लोनच्या तुलनेत व्याजदर खूपच कमी आहे. पण गोल्ड लोनवर प्रोसेसिंग फी भरावी लागेल. ही फी 250 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत असू शकते.

पीपीएफ लोन (PPF Loan)- तुम्ही पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली असेल तर तुम्ही त्यावर कर्ज देखील घेऊ शकता. परंतु या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पीपीएफ खाते किमान एक आर्थिक वर्ष जुने असणं आवश्यक आहे. पीपीएफवर घेतलेल्या कर्जा व्याज दर पीपीएफ खात्याच्या व्याजदरापेक्षा फक्त 1% जास्त असतो. म्हणजेच, जर तुम्ही पीपीएफ खात्यावर 7.10% व्याज घेत असाल, तर तुम्हाला कर्ज घेतल्यावर 8.10% व्याज द्यावे लागेल. हे कर्ज तुम्हाला 36 हप्त्यांमध्ये फेडावे लागेल.

Good News: सरकारी बँकेकडून दोन नव्या डिपॉझिट स्किम लाँच, व्याजदर जास्त असल्याने होणार फायदा

प्रॉपर्टी मॉर्गेज लोन (Property Mortgage Loan)- जर तुम्हाला जास्त पैशांची गरज असेल तर तुम्ही बँकेकडे मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. बँका मालमत्ता गहाण ठेवून कर्ज देतात. याद्वारे तुम्ही 10 कोटींपर्यंत कर्ज घेऊ शकता आणि हे कर्ज दोन वर्ष ते 15 वर्षांपर्यंत फेडू शकता. आपण निवासी आणि व्यावसायिक दोन्ही मालमत्ता तारण म्हणून वापरू शकता. यावरही तुम्हाला वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत स्वस्त दरात व्याज मिळते.