Optical Illusion in marathi : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. हजारो लोकांपैकी मोजकेच लोक असे असतात जे निर्धारित कालमर्यादेत दडलेले रहस्य शोधून काढतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. (Optical illusion Find the rhinoceros hidden among the elephants in this photo in 10 seconds mind game nz)
असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे ते चित्र दिसायला खूप सोपे आहे पण त्यात एक रहस्य दडलेले आहे आणि तुम्हाला ते शोधून दाखवावे लागेल. आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला हत्तींच्या कळपाच्या मध्यभागी लपलेला एक गेंडा शोधायचा आहे. हे कोडं सोडवण्यासाठी अवघी 10 सेकंद तुमच्याजवळ आहेत.
या ऑप्टिकल भ्रमात गेंडा शोधणे सोपे काम नाही. हत्ती आणि गेंडाचा रंग सारखाच असतो, त्यामुळे अशा परिस्थितीत हा गेंडा शोधण्यासाठी तुम्हाला आणखी मेहनत करावी लागणार आहे. फोटोमध्ये लपलेला हा गेंडा शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंद आहेत, जर तुम्हाला तो 10 सेकंदात सापडला तर तुम्ही हे आव्हान जिंकाल.
जर तुम्ही हा ऑप्टिकल भ्रम सोडवू शकला नसाल आणि तरीही या फोटोकडे पहात असाल, तर आम्ही तुम्हाला हा लपलेला गेंडा शोधण्यात मदत करतो. फोटोतील एका दगडाजवळ काळजीपूर्वक पहा, जिथे हा गेंडा लपला आहे. आता हा गेंडा तुम्हाला सहज मिळेल.जर अजूनही तुम्हाला गेंडयाला शोधणे कठीण जात असेल तर आम्ही एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तुम्ही सहज पाहू शकता.