High Return Stocks : 'या' ३ शेअर्सकडून गुंतवणुकदारांना बंपर रिटर्न्स, ६ महिन्यात दुप्पट रक्कम

हे तीन शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल 

Updated: Jul 9, 2021, 02:59 PM IST
High Return Stocks : 'या' ३ शेअर्सकडून गुंतवणुकदारांना बंपर रिटर्न्स, ६ महिन्यात दुप्पट रक्कम  title=

मुंबई : High Return Stocks : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. मात्र आयटी शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरली आहे. आता आपण पाहूया 3 मल्टीबॅगर रिटर्न्स देणार शेअर. ज्यांनी गुतंवणूकदारांना अगदी मालामाल करून टाकलं आहे. तसेच BSE Sensex आणि Nifty ने 9 ते 12 टक्के रिटर्न्स दिले आहेत. 

1. Happiest Minds Technologies 

या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त याच वर्षी 257 टकक्यांहून अधिक रिटर्न दिले. या कंपनीचा आणखी एक सॉलिड ट्रॅक रेकॉर्ड आहे. 1 जानेवारी 2021 मध्ये या कंपनीचं शेअर 338 रुपये प्रति आहे. 1220 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत असते. याचं मार्केट कॅप 17.76 लाख करोड रुपयांहून अधिक झालं आहे. 

जर तुम्ही यावर्षाच्या सुरूवातीला या कंपनीत 5 लाख रुपये गुंतवले असतील. तर तुम्हाला 338 रुपयांचे 1479 शेअर्स मिळते. ज्याची आजच्या दिवसाला किंमत जवळपास 18 लाख रुपये झाली असेल. याचा 52 आठवड्यातील उच्चांत हा 1247 इतका आहे.

2. Subex Limited 

बंगलुरूतील या कंपनीतून यावर्षी सर्वाधिक रिटर्न्स मिळाले आहेत. 1 जानेवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर 28.85 रूपये होते. तर आता या शेअर्सची किंमत 73 रुपये आहे. म्हणजे या शेअरने अवघ्या 6 महिन्यात 160 टक्के रिटर्न गुंतवणूकदारांना मिळवून दिले आहेत. जर तुम्ही 1 जानेवारी 2021 मध्ये या कंपनीत 5 लाखाची गुंतवणूक केली असेल तर आज याची किंमत 13 लाखाहून अधिक आहे. 

3. Brightcom Group 

डिजिटल मार्केटिंग कंपनीतील शेअर्स फक्त 6 महिन्यांतच वाढले आहेत. 1 जानेवारी रोजी शेअरची किंमत 8.7 रुपये प्रति शेअर आहे. तर आज या शेअरची किंमत 32.5 रुपये प्रति शेअर आहे. आता 273 टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळाले आहेत. या कंपनीत 1 जानेवारी 2021 पर्यंत 5 लाख गुंतवणूक केली असेल तर आज याची किंमत 18.67 लाख रुपये इतकी आहे.