...आतापर्यंतचे १० 'सर्जिकल स्ट्राइक'

जाणून घेऊया आतापर्यंतच्या 'सर्जिकल स्ट्राइक'विषयी

Updated: Sep 29, 2019, 02:55 PM IST
...आतापर्यंतचे १० 'सर्जिकल स्ट्राइक' title=
संग्रहित फोटो

मुंबई : भारतीय लष्कराच्या शौर्यगाथेचं प्रत्यक्ष उदाहरण असलेल्या उरी सर्जिकल स्ट्राईकला (Uri Terror Attack) आज तीन वर्षं पूर्ण होत आहेत. अतुलनीय शौर्य आणि साहस यांचा जीवंत अनुभव सर्जिकल स्ट्राईकने (Surgical Strike)देशवासीयांना घडवला. याच दिवशी भारतीय लष्करातल्या वीर जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून, दशतवाद्यांचा खात्मा केला होता. 

काश्मीरमधल्या भारतीय लष्कराच्या उरी तळावर दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ रोजी हल्ला केला होता. त्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराच्या पॅरा SFने धाडसी मोहीम आखून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून, २९ सप्टेंबर २०१६ रोजी सर्जिकल स्ट्राईक केला होता. 

२५ पॅरा कमांडोंनी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान केलेल्या या धाडसी कारवाईत, तब्बल ४० ते ५० दहशतवाद्यांचा निप्पात केला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही लष्करी कारवाई केली गेली होती. 

जाणून घेऊया आतापर्यंतच्या 'सर्जिकल स्ट्राइक'विषयी

 

२६ फेब्रुवारी २०१९

नियंत्रण रेषेवर (LoC) जैशच्या दहशतवादी ठिकाणांवर एयरफोर्सचा हल्ला
'मिराज २०००'च्या हल्ल्यात दहशतवादी कॅम्प आणि लॉन्चिंग उद्धस्त

२८-२९ सप्टेंबर २०१६

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सेनेकडून दहशतवादी कॅम्पवर हल्ला

मे २०११

अमेरिकी कमांडोकडून पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा
लादेनला मारण्यासाठी अमेरिकेकडून operation geronimo चालवण्यात आले होते.

२००६ 

अमेरिकी सेनेकडून अबु मुसाब अल-जरकावी (abu musab al zarqawi)विरुद्ध स्ट्राइक 

२००३

दहशतवादी खालिद शेख मोहम्मदला (Khalid Sheikh Mohammed) पकडण्यासाठी CIA (Central Intelligence Agency)चे ऑपरेशन 

रावळपिंडीमध्ये सर्जिकल स्ट्राइकमध्ये खालिद शेख मोहम्मदला पकडण्यात आले

एप्रिल २००३ 

अमेरिकी सैनिक जेसिका लिन्चची (Jessica Lynch) सुटका करण्यासाठी इराकमध्ये सर्जिकल स्ट्राइक

अमेरिकी सेनेने इराकच्या रुग्णालयातून जेसिका यांची सुटका केली

१९८९

पनामाचे तानशाह मॅन्युअल नोरिएगाला (manuel noriega)पकडण्यासाठी 'ऑपरेशन निफ्टी पॅकेज'

१९७६

इस्राइलकडून, युगांडातील एन्टेबेमध्ये १०२ लोकांना सोडवण्यासाठी हल्ला

१९६१

फिदेल कास्त्रोविरोधात (Fidel Castro) 'बे ऑफ पिग्स'मध्ये CIA चा (Central Intelligence Agency)हल्ला

अमेरिकेचे प्रयत्न असफल, १०० सैनिकांचा मृत्यू