पैज लावून सांगतो, देशात तिसरी लाट येणार नाही; शेअर मार्केटच्या बिग बुलने केली भविष्यवाणी

 भारतातील वॉरेन बफे म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध उद्योगपती राकेश  झुनझूनवाला यांनी तिसऱ्या लाटे संदर्भात मोठा दावा केला आहे. 

Updated: Jun 23, 2021, 10:13 PM IST
पैज लावून सांगतो, देशात तिसरी लाट येणार नाही; शेअर मार्केटच्या बिग बुलने केली भविष्यवाणी title=

नवी दिल्ली :  देशात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांचे आयुष्य् उद्धस्त झाले. आता दुसरी लाट कमी होत असली तरी, तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही तसाच आहे. अनेक तज्त्रांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. परंतु भारतातील वॉरेन बफे म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध उद्योगपती राकेश  झुनझूनवाला यांनी तिसऱ्या लाटे संदर्भात मोठा दावा केला आहे. 

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असा दावा झुनझूनवाला यांनी केला आहे. राकेश झुनझूनवाला यांनी याबाबत चक्क पैंज लावली आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट  येणार नाही त्यामुळे मार्केटमधील गुंतवणूकदारांनी काळजी करू नये असे झुनझूनवाला यांनी म्हटले आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या तिसरी लाट आली आहे. भारतातही तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु भारतात सुरू असलेले लसीकरण आणि आतापर्यंत झालेल्या संसर्गाचा विचार करता लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची सुताराम शक्यता नाही असे झुनझूनवाला यांनी म्हटले आहे. देशात आतापर्यंत लसीचे 28 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

तिसरी लाट आली तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार नाही. उलट काही सुधारणा होऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरू नये. शेअर बाजार सकारात्मकच राहिल असे झुनझूनवाला यांनी म्हटले आहे.