पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ड्रोन (Drones) खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने (Central Govt for farmers) एक उत्तम योजना सुरू केलीय. या ड्रोनच्या योजनेअंतर्गत (Under the Plan of Drones) ड्रोनच्या खरेदीवर 50 टक्के सबसिडी (Drone subsidy) दिली जात आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्ही पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकता. अल्पभूधारक शेतकरी (Smallholder farmers), ईशान्येकडील राज्यांतील शेतकरी (Farmers in North Eastern States) आणि महिला शेतकरी (Women farmers) ड्रोन सबसिडी स्कीम (Drone Subsidy Scheme) साठी पात्र असतील. तर इतर शेतकऱ्यांना 4 लाख रुपयांपर्यंत किंवा ड्रोनवरील खर्चाच्या 40 टक्के अनुदान मिळू शकणार आहे.
ड्रोन सबसिडी स्कीम
ड्रोनद्वारे शेतकरी सहजपणे त्यांच्या पिकांवर खते (Fertilizers on crops) आणि इतर रसायनांची फवारणी (Spraying of chemicals) करतात. त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो. यासोबतच रसायनांचा अपव्ययही कमी होईल. अशा परिस्थितीत केंद्राच्या ड्रोन सबसिडी स्कीम (Drone Subsidy Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्याची उत्तम (Better to buy a drone) संधी आहे. त्याचबरोबर भारतातील शेतकऱ्यांनीही विकसित देशांप्रमाणे नवीन तंत्र (A new technique) वापरून शेती कराणे गरजेचं आहे. जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त उत्पादन (more production) मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थितीही चांगली राहिल.
पिकांची नोंद ठेवणं सोप
शेतकरी स्वतः पिकांवर कीटकनाशके (Pesticides on crops) आणि इतर रसायनांची फवारणी (Spraying of chemicals) करतात. अशा स्थितीत त्यांच्या आरोग्यावर, कीटकनाशके ( health, pesticides) आणि इतर रसायनांचा वाईट परिणाम होताना आढळतो. त्याचबरोबर ड्रोनच्या साहाय्याने रसायनांची फवारणी (Spraying of chemicals)कमी वेळेत होते. आणि ते कीटकनाशकांच्या संपर्कात (Exposure to pesticides) येत नाही. यासोबतच ड्रोनमध्ये बसवलेल्या हाय रिझोल्युशन कॅमेऱ्यांद्वारे (Through high resolution cameras) शेतकरी आपल्या पिकांच्या आरोग्याच्या नोंदी घरी बसून आरामात ठेवू शकतात.
ड्रोनमुळे वेळ वाचणार
शेतकऱ्यांना पूर्वी जिथे एक एकर जागेवर हाताने रसायने फवारण्यासाठी काही तास लागायचे, आता ते काम ड्रोनद्वारे 10-15 मिनिटांत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा बराच वेळ वाचेल. तसेच ड्रोनद्वारे खालच्या दिशेने फवारणी केल्याने केवळ रसायनांचा अपव्यय (Waste of chemicals) कमी होत नाही तर पिकांना रसायनांच्या अतिसंसर्गापासून वाचवता येऊ शकेल. त्याचबरोबर हाताने फवारणी (Hand spraying)करताना माती आणि रासायनिक अपव्यय (Soil and chemical waste) होण्याची दाट शक्यता असते. हे देखील कमी होण्यास मदत होईल.