राजधानी दिल्लीत लवकरच नाहीसा होणार कोरोना व्हायरस

कोरोना बाधितांचा वेग मंदावला

Updated: Jul 20, 2020, 08:11 PM IST
राजधानी दिल्लीत लवकरच नाहीसा होणार कोरोना व्हायरस title=

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत कोरोना बाधितांचा वेग मंदावला आहे. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत १ हजारांपेक्षा देखील कमी कोरोना रुग्ण समोर आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत ९५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार ७८४ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर आले असूण ३५ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. 

दिल्लीत आतापर्यंत  १ लाख २३ हजार ७४७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १ लाख ४ हजार ९१८ रुग्णांनी कोरोनावर मात केलं आहे. सध्या १५ हजार १६६ रुग्णांवर उपचार सुरू असून ३ हजार ६६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्याच्या घडीला देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही ११,१८,०४३ इतकी झाली आहे. ज्यामध्ये ३,९०,४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ७,००,०८७ रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळं जीव गमवावा लागलेल्यांची संख्या २४,४९७ वर पोहोचली आहे.