भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) ब्रिटनमध्ये (Britain) सत्तेची धुरा सांभाळणार आहेत. ऋषी सुनक यांनी मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ब्रिटनचे पंतप्रधान होणारे ते पहिले हिंदू आहेत. सुनक (Rishi Sunak) हे पंतप्रधान होताच भारतीयांकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच राजकीय क्षेत्रातूनही त्यांचे अभिनंदन करण्यात आलं आहे. मात्र याचे पडसादही भारतात उमटले आहेत. ऋषी सुनक यांच्या निवडीनंतर एका भाजप (BJP) नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. (Telangana ex mp Rapolu Ananda Bhaskar quits BJP)
तेलंगणातील (telangana) भाजपचे (BJP) नेते आणि माजी राज्यसभा खासदार (Rajya Sabha) आनंद भास्कर रापोलू (Rapolu Ananda Bhaskar) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदत्वाचा राजीनामा दिला आहे. रापोलू यांनी पत्र लिहित आपला राजीनामा पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्याकडे पाठवला आहे. या पत्रात रापोलू यांनी ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या नियुक्तीचा संदर्भ देऊन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
पक्ष सोडताना त्यांनी गेल्या चार वर्षांपासून पक्षात अपमान होत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या 4 वर्षांपासून मला राष्ट्रीय भूमिकेत दुर्लक्षित, अपमानित केले जात आहे. तसेच कमी लेखले जात आहे, असे आनंद भास्कर रापोलू म्हणाले. रापोलू यांनी जेपी नड्डा यांना पत्र लिहून भाजपच्या धर्मनिरपेक्षाच्या तत्त्वांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
"भाजपमध्ये धर्मनिरपेक्षता आहे. पक्ष वसुधैव कुटुम्बकमवर विश्वास ठेवतो, पण पक्षात या तत्त्वाचे काही पालन होते का?" असा सवाल रापोलू यांनी केला आहे. "भाजपमध्ये वसुधैव कुटुंबकम या तत्वाचे पालन होते का? ब्रिटनने केवळ 3 टक्के लोकसंख्या असलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला पंतप्रधान बनवलं. अमेरिकेमध्ये तर आधीच भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. हे देश एकप्रकारे दुर्लक्षित घटकालाही प्रोत्साहन देत आहेत," असे आनंद भास्कर रापोलू यांनी म्हटलं आहे.
BJP leader from Telangana & former Rajya Sabha MP Anand Bhaskar Rapolu resigns from the primary membership of the party today; states, "for the last 4 years, I was ignored, humiliated, underrated and excluded in national role." pic.twitter.com/cKPvpiEjoo
— ANI (@ANI) October 26, 2022
माजी राज्यसभा सदस्य आनंद भास्कर रापोलू यांनी भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये सामील होण्याची चर्चा सुरु होती. यामुळे आज त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
कोण आहेत आनंद भास्कर रापोलू?
आनंद भास्कर रापोलू यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याआधी ते 25 वर्षे काँग्रेस पक्षात होते. आनंद भास्कर यांनी काँग्रेसमधून नाराजीमुळे राजीनामा दिला होता आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.