TATA कडून विविध पदांची भरती जाहीर, मुंबईत नोकरी आणि 1 लाखपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज

Jobs in TATA 2024:  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाची संस्था आहे.

Pravin Dabholkar | Updated: Oct 10, 2024, 06:50 PM IST
TATA कडून विविध पदांची भरती जाहीर, मुंबईत नोकरी आणि 1 लाखपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज title=
टाटामध्ये नोकर भरती

Jobs in TATA 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. टाटा इंडस्ट्रीमध्ये अंतर्गत येणाऱ्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडांमेंटल रिसर्चमध्ये टीआयएफआरमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा तपशील देण्यात आला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाची संस्था आहे. ज्यामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत? जाणून घेऊया. 

पात्रता 

टीआयएफआरमध्ये सायंटिफिक ऑफिसर, अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर, सुपरव्हायजर कॅन्टीन, क्लर्क, वर्क असिस्टंट, प्रोजेक्ट सायन्टिफिक ऑफिसर, ट्रेड्समन ट्रेनी वेल्डर, ट्रेड्समन ट्रेनी फिटर या जागांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून आयटीआय/ बारावी/ ग्रॅज्युएशन/ बीई/ बीटेक/ कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ हॉटेल मॅनेजमेंट इ. मध्ये मास्टर्स केलेले असावे. उमेदवार भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पात्रतेशी संबंधित तपशील देण्यात आला आहे.

वयोमर्यादा 

टाटा इन्स्टिट्यूटच्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे कमाल वय पदानुसार 28 ते 43 वर्षांदरम्यान असावे. 1 जुलै 2024 पर्यंत वयाची गणना केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोगटात सवलत दिली जाणार आहे.

पगार 

विविध पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 18 हजार 500 ते 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

कशी होईल निवड?

लेखी परीक्षा आणि व्यापार/कौशल्य चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

कुठे पाठवाल अर्ज?

यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांना शेवटच्या तारखेपर्यंत अर्जाची हार्ड कॉपी संस्थेकडे जमा करावी लागेल. उमेदवारांनी आपले अर्ज प्रशासकीय अधिकारी, रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभी रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 

अर्जाची शेवटची तारीख

याच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 26 ऑक्टोबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे. उमेदवार TIFR च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा