कोरोनाशी लढा जिंकलेल्या 'या' देशाची भारताला मोठी मदत

'या' देशाने अमेरिका आणि युरोपला देखील केली मदत 

Updated: Apr 12, 2020, 10:43 AM IST
कोरोनाशी लढा जिंकलेल्या 'या' देशाची भारताला मोठी मदत  title=

मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगाला वेढीस धरलं आहे. प्रत्येक देश कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशावेळी ताइवानने कोरोनाशी लढा दिला आहे. आणि आता ताइवान भारताच्या मदतीसाठी हात पुढे करत आहे. ताइवानने कोरोनाशी लढण्यासाठी १४ हजार भारतीय चिकित्सा कर्मचाऱ्यांसोबत आपला अनुभव शेअर करत आहे.

२ एप्रिल रोजी ९००० कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फ्ररन्सद्वारे संवाद साधण्यात आला. यानंतर आता ताइवान १४ एप्रिल रोजी होणाऱ्या कॉन्फरन्स कॉलमध्ये ५०००भारतीय चिकित्सा कर्मचाऱ्यांना माहिती देणार आहे. 

'आमच्या नऊ साऊथ बाऊंड पॉलिसीमध्ये भारत एक महत्वाचा देश आहे. जागतिक साथीच्या रोगाने लढण्यासाठी आमच्या सरकारने भारत आणि इतर देशांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे,' अशी माहिती दिल्लीत असलेल्या ताइवानच्या कार्यालयातील प्रतिनिधींनी दिली आहे. 

डॉ. चेन यांनी ताइवान नॅशनल चेंग कुंग युनिर्वसिटी हॉस्पिटलने (NCKUH) २ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या पहिल्या राऊंडमध्ये भारतीय डॉक्टर्स, नर्ससोबत संवाद साधला. या दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न देखील विचारले. 

भारतातील दोन फार्मा कंपन्यांनी कोरोना विरोधात भारत-ताइवान मदतीमध्ये पुढाकार घेतला आहे. ९००० कर्मचाऱ्यांना मुंबईत असलेल्या ALKEM लॅबोरेटरीज लिमिटेडच्या मदतीने प्रशिक्षिण देण्यात आलं. तर ५००० आरोग्य कर्मचाऱ्यांना वेरीटेज हेल्थरकेअर लिमिटेडच्या मदतीने प्रशिक्षण दिलं आहे. 

दोन्ही कंपन्यांनी पीआर कंपन्यांच्या मदतीने भारताच्या हॉस्पिटलशी जोडलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाशी ताइवानने जसा लढा दिला आहे त्यावरून त्यांच कौतुक होत आहे. ताइवान हा असा देश आहे ज्यांची लोकसंख्या जास्त असून फक्त ३८५ कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. ज्यामध्ये ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर ९९ रूग्ण ठिक होऊन घरी गेले आहेत. 

१ एप्रिल रोजी ताइवानने आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीला सुरूवात केली. ज्यामध्ये अमेरिका आणि युरोपला १० मिलियन मेडिकल मास्क आणि अन्य चिकित्सा सहाय्यता उपलब्ध करून दिली.