दाऊदचं हॉटेल पाडून तेथे शौचालय बांधणार - स्वामी चक्रपाणी

भारतातचा सर्वात मोठा शत्रू आणि मोस्ट वॉन्टेड दाऊदची संपत्तीचा मंगळवारी लिलाव करण्यात येणार आहे. दिल्लीतील रोनक अफरोज हॉटेलचा देखील समावेश आहे.

Updated: Nov 13, 2017, 12:54 PM IST
दाऊदचं हॉटेल पाडून तेथे शौचालय बांधणार - स्वामी चक्रपाणी title=

नवी दिल्ली : भारतातचा सर्वात मोठा शत्रू आणि मोस्ट वॉन्टेड दाऊदची संपत्तीचा मंगळवारी लिलाव करण्यात येणार आहे. दिल्लीतील रोनक अफरोज हॉटेलचा देखील समावेश आहे.

दाऊदचं हे हॉटेल हिंदूत्ववादी नेते स्वामी चक्रपाणी घेणार आहेत. असं ते म्हणतायंत. स्वामी चक्रपाणी हे त्या जागेवर एक सार्वजनिक शौचालय बनवणार आहेत.

चक्रपाणी यांचं म्हणणं आहे की, भारत सरकार दाऊदबाबत मोठ्या मोठ्या गोष्ट लोकांसमोर ठेवल्या. त्यामुळे सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चक्रपाणी दाऊदचं हे हॉटेल खरेदी करुन दाऊदची ही भीती संपवणार असल्याचं म्हणत आहेत.

याआधी २०१५ मध्ये झालेल्या दाऊदच्या गाडीच्या लिलावात चक्रपाणी यांनी ती विकत घेऊन सगळ्यांसमोर तिला पेटवून दिली होती. यानंतर दाऊद कडून त्यांना धमक्या देखील मिळाल्या होत्या असं चक्रपाणी यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारने दाऊदची मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी देखील प्रयत्न केला होता पण त्यावेळी बोली लावण्यासाठी कोणी पुढे आलं नव्हतं.