कर्नाटकवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; भाजपाला धक्का

 सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. यामुळे येडियुरप्पांच्या बहुमचाचा फैसला हा उद्या दुपारी होणार आहे.

Updated: May 18, 2018, 12:30 PM IST
कर्नाटकवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; भाजपाला धक्का title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला उद्या दुपारी ४ पर्यंत बहुमत सिद्ध करा, असा निर्वाळा दिला आहे, दोन-तीन दिवस नाही, तर अवघ्या २४ तासांच्या आत भाजपाला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे, तसेच भाजपाने बहुमत सिद्ध केलं नाही, तर ही संधी काँग्रेस-जेडीएसला द्यावी लागणार आहे. या वरून आता भाजपाची खरी राजकीय कसोटी लागणार आहे. घोडेबाजार थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उद्या दुपारी ३ ते ४ वाजेची वेळ ही सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. तसेच गुप्तमतदानाने बहुमत चाचणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. भाजपाच्या वकिलांनी मात्र सोमवारपर्यंतची वेळ मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. यामुळे येडियुरप्पांच्या बहुमचाचा फैसला हा उद्या-शनिवारी दुपारी होणार आहे.

काँग्रेसचा सर्वोच्च न्यायालयात दावा

सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसच्या वकिलाने युक्तिवाद करताना म्हटलं आहे, 'कर्नाटकात आम्हाला उद्या बहुमत सिद्ध करायला सांगा, आम्ही उद्या बहुमत सिद्ध करून दाखवू'. यापूर्वी सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला सल्ला दिला होता, तुमच्याकडे बहुमताएवढे आमदार असतील तर तुम्ही उद्याच, बहुमत सिद्ध करून दाखवा. यानंतर काँग्रेसच्या वकिलाने हा दावा केला आहे की, आम्हाला सांगा आम्ही उद्याच तुम्हाला बहुमत सिद्ध करून दाखवू.

काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल

यानंतर काँग्रेसच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करताना सांगितलं, राज्यपालांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्याचं जे आमंत्रण दिलं आहे, ते मुळातच चुकीचं आहे, चुकीच्या निर्णयावर भाजपा कसं बहुमत सिद्ध करणार, असा सवाल केला आहे.

भाजपाच्या बाजुने रोहतगी

कपिल सिब्बल हे जेडीएसचे वकील आहेत, कपिल सिब्बल हे काँग्रेस नेते आहेत, तर भाजपाच्या बाजुने रोहतगी हे युक्तिवाद करत आहेत. बहुमत नसेल तर हंमामी अध्यक्ष नेमा असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे, तसेच तातडीने बहुमताची चाचणी घ्या, असं युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. तर तातडीने बहुमताची चाचणी नको, असं भाजपाचे वकील रोहतगी यांनी म्हटली आहे.

भाजपाकडे बहुमताचा आकडा नाही, आणि काँग्रेस जेडीएसकडे बहुमताचा आकडा नाही तरी सुद्धा काँग्रेस-जेडीएसला बहुमत सिद्ध करण्याची संधी का देण्यात आली नाही, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.