रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : महिलांच्या बाजूने असल्यामुळे पुरुषांचा छळ होत असून कायदे बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
कायदे करण्याचा अधिकार संसदेचा असून कायद्यात बदल करावयाचा असेल संसदेतूनच करा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
पुरुषांच्या छळा संदर्भातची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. बलात्कार आणि लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांत लिंग भेद करू नये, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. महिलांद्वारे पुरूषांचा छळ केला जातो. परंतू कायदे केवळ महिलांच्या बाजूने आहेत. अशी भूमिका याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली होती.
Supreme Court rejects petition seeking to make the crime of rape gender-neutral.
— ANI (@ANI) February 2, 2018
कायदे महिलांच्या रक्षणासाठी बनवले आहेत. जर पुरूषांना त्यात बदल करावे वाटत असेल तर ते काम संसदेचे आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आहे.