बंगळुरु : कर्नाटकमधील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. भाजप समर्थक आमदारांची यादी सादर करण्याची नोटीस सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांना बजावलीय. याप्रकरणी उद्या सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि भाजपच्या वकीलांमध्ये युक्तीवादाचा जोरादार फड रंगला. सर्वोच्च न्यायालयानं शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिलेला असला, तरी राज्यपालांनी येडियुरप्पांना दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाविषयी काँग्रेस आणि जेडीएसच्या याचिकेवर अद्याप निर्णय दिलेला नाही. निमंत्रण देण्याआधी राज्यपालांना दिलेली सत्तास्थापनेचा दावा करणारी दोन पत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायनं येडियुरप्पा आणि भाजपच्या वकीलांना दिले आहेत. या संदर्भातील पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
कर्नाटकात भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलरच्या नेत्यांकडून विधीमंडळाच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. त्रिशंकू विधानसभा असलेल्या कर्नाटकात बुधवारी रात्री राज्यपाल वजूभाई वाला यांनी अखेर भाजपाल सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. याविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र सुप्रीम कोर्टाने शपथविधी सोहळ्याला स्थगिती देण्यास नकार दिला. या आंदोलनात गुलाम नवी आझाद, अशोक गेहलोत, मल्लिकार्जून खरगे आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ताकारणाची लढाई आता सोशल मीडियावरही तितक्याच ताकदीनं लढायला सुरूवात झालीय. कर्नाटकात येडियुरप्पांचा शपथविधी झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी टीका केलीय. कर्नाटकात येडियुरप्पांचा शपथविधी झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी टीका केलीय.
कर्नाटकात पुरेसं संख्याबळ नसताना भाजपचा सत्तास्थापनेचा अतार्किक अट्टाहास म्हणजे घटनेची थट्टा आहे. भाजप त्यांचा निरर्थक विजय साजरा करतंय आणि देश लोकशाहीच्या पराभवाचा शोक व्यक्त करतोय. भाजप आज विजयी जल्लोष करेल, मात्र दूसरीकडे संपूर्ण देशाला लोकशाहीच्या पराभवाचं दु:ख असेल असं राहुल गांधींनी ट्विट केलं. या ट्विटला अमित शाहांनी जोरदार पलटवार केलाय. ज्या पक्षानं देशात आणीबाणी आणली त्या पक्षाचे राहुल गांधी वारसदार असल्याच पलटवार अमित शाहांनी केलाय.