Stocks to buy: आठवड्याच्या शेवटी तुमच्या खिशाला घसघशीत returns देतील 'हे' stocks...

आज शुक्रवारी या विकेंडला काही दमदार स्टॉक्स तुम्ही घेऊ शकता. तेव्हा पाहून या पाच स्टॉक्सविषयी. 

Updated: Nov 4, 2022, 08:33 AM IST
Stocks to buy: आठवड्याच्या शेवटी तुमच्या खिशाला घसघशीत returns देतील 'हे' stocks...  title=

Stocks to buy: सध्या सगळीकडेच जागतिक पातळीवर मंदींची (Recession) वातावरण आहे. त्यातून 2023 मध्ये मंदीचे संकेत दिसू लागले आहेत. त्यामुळे शेअर मार्केटमध्येही जोरदार चढउतार पाहायला मिळणार आहेत. तेव्हा जाणून घेऊया नक्की याच आठवड्याच्या शेवटी तुम्ही कशाप्रकारचे स्टॉक्स खरेदी करू शकता. आज शुक्रवारी या विकेंडला (Weekend) काही दमदार स्टॉक्स तुम्ही घेऊ शकता. तेव्हा पाहून या पाच स्टॉक्सविषयी. (
stocks to buy these are the five stock you can take for this weekend) 

MAcrotech Ddevelopers: लोढा ग्रुपची ही एक छोटी रियल इस्टेट कंपनी आहे. या स्टॉकला तुम्ही खरेदी करू शकता कारण सध्या या स्टॉकची (Stocks) सगळीकडेच शिफारस केली जात आहे. शुक्रवारी हा शेअर 955 रूपयांवर बंद झाला. सोबतच या शेअरवर 1530 रूपयांवर टार्गेट दिलं आहे. यावर्षी हा शेअर 23 टक्क्यांनी घसरला होता परंतु ट्रेण्ड विश्लेषकांच्या (Trade Analyst) मते हा स्टॉक लवकरच उभारी घेईल. 

Cholamandalam: हा शेअर 757 रूपयांवर बंद झाला आहे. हा शेअर विकत घेण्याबाबतही अनेक विश्लेषकांनी शिफारस केली आहे. हा स्टॉक 910 रूपयांवर पाहचू शकतो.  रिपोर्टनूसार दुसऱ्या तिमाहीत मजबूत डिस्बर्समेंटसोबतच AUM वाढीची नोंद झाली आहे. ग्रॉस और नेट NPA मध्येही यावेळी घट झाली आहे. विश्लेषकांनुसार हा शेअर जोरात धावू शकतो. 

SBI: या शेअरला खरेदीसाठी विश्लेषकांनी सांगितले आहे. 700 रूपयांचा टार्गट या शेअरवर (Share Target) आहे. त्यासोबतच 520 रूपयांचा स्टॉप लॉसही होणार असल्याचे वर्तवले आहे. रिपोर्टनूसार हा शेअर 1 हून 3 महिन्यांत 20 टक्क्यांचा रिटर्न देऊ शकतो. 5 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत हा स्टॉक जारी होईल. 

Sun Pharma: फार्मा सेक्टरकडून या स्टॉकमध्ये खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या शेअरला 1240 चं टारगेट आहे. MOFSL च्यानुसार, कंपनीने दुसऱ्या तिमाहीत चांगले रिझल्ट्स सांगितले आहेत. रेव्हेन्यू ग्रॉथच्या हिशोबानं यावर 14 टक्के वाढ राहिल तर तुमचा ग्रॉस मार्जिन 150 बेसिस पोईंट्सवर (Basis Points) आधाराला असेल. कंपनी स्पेश्यालिटी पोर्टफेलियोवर लक्ष केंद्रित करते आहे. या स्टॉकमध्ये चांगली वाढ पाहायला मिळते आहे त्यामुळे हा स्टॉक तुम्हाला चांगला सपोर्ट करेल. 

ITC: हा शेअरही तुम्ही खरेदी करू शकता. 1 वर्षाच्या काळात या शेअरचा भाव 400 रूपयांपर्यंत पोहचला आहे. हा स्टॉक 354 रूपयांवर ट्रेड करतो आहे. रिपोर्टनुसार ही कंपनी चांगल्या प्रकारे तिच्या कामकाजात वाढ करते आहे त्यातून हा स्टॉक घेतल्यावर तुम्हाला चांगले रिटर्न्स (Returns) मिळतील.