मुंबई : शेअर बाजारने आजच्या व्यवसायाच्या सुरूवातीला आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सेंसेक्स पहिल्यांदाच 55 हजारांच्या पार पोहचला आहे. तसेच निफ्टी पहिल्यांदा 16400 च्या पुढे गेला आहे. बँक, फायनांशिअल, ऑटो आणि आयटी सह इतर क्षेत्रातही तेजी दिसून येत आहे. लार्ज कॅप शेअर्समध्ये जबरजस्त रॅली दिसून येत आहे. ज्यामध्ये बँकांचा सपोर्ट दिसून येतोय. मार्केटच्या आजच्या टॉप गेनर्समध्ये HDFC, M&M, LT, HDFCBANK, ICICIBANK, INDUSINDBK, TCS आणि ITC चा सामावेश आहे.
बाजारासाठी आज ग्लोबल मार्केटमधून संमिश्र संकेत होते. गुरूवारी अमेरिकी बाजारात तेजी दिसून आली होती. Dow Jones आणि S and P 500 उच्चांकी स्तरावर बंद झाला. अमेरिकेत इकोनॉमिक रिकवरी गतीने होत आहे. तसेच कालच्या मार्केटच्या व्यवसायात तंत्रज्ञान कंपन्यांचा सपोर्ट मिळाला होता. कंपन्यांना चांगल्या नफ्याची आशा आहे. त्यामुळे टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांची खरेदी वाढली आहे.
गुरूवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली होती.सेंसेक्स तसेच निफ्टी दोन्ही रेकॉर्ड स्तरावर बंद झाले होते. काल आयटी, बँक, फायनान्स, ऑटो आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी पहायला मिळाली होती. POWERGRID, TECHM, HCLTECH, TITAN, LT आणि NTPC च्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती.