मुंबई : लग्नानंतर नववधुचे सगळेच लाड पुरविले जातात. मग तिचा हट्ट जीवघेणा का असो? असाच एका नववधुचा हट्ट पुरवणं कुटुंबियांना भारी पडला आहे. नववधुला काडतुसाने भरलेल्या बंदुकीसोबत सेल्फी घेणं चांगलच महागात पडलं आहे. काडतुसाने भरलेली बंदुक आणि त्यासोबत सुरू असलेली मस्ती ही नववधुला आणि तिच्या कुटुंबियांना चांगलीच महागात पडली आहे. (Newly Married Woman shoots self in Us Hardoi while clicking selfie)
उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील एका नववधुला एका चुकीमुळे आपला जीव गमवावा लागला. काडतुसाने भरलेल्या बंदुकीसोबत मस्ती करणं तिच्या जीवावर बेतलं. या प्रकरणावर नववधुच्या कुटुंबियांनी ही गोष्ट अशीच घडली यावर ठाम आहेत. मात्र यावर आता संशयाची सुई फिरत आहे. हुंड्यासाठी नववधुची हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी लावला आहे.
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हरदोई परिसरातील शाहाबाद येथील आहे. मृतक नववधुच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. सासरची मंडळी हुंड्यात 2 लाख रोकड रुपयांची मागणी करत होते. दोन महिन्यांच पूर्वी हा विवाह पार पडला होता. आता या प्रकरणाला दुर्घटना असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृतक नववधुच्या नवऱ्या, सासऱ्या आणि दिराविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तरुण आकाश गुप्ता याचं दोन महिन्यांपूर्वी राधिका नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. सगळं ख्यालीखुशालीने सुरु होतं, असं सासरच्यांचं म्हणणं आहे. तरुणीच्या सासऱ्याची बंदूक घरात होती. या बंदुकीसोबत फोटो काढण्याचा तिला मोह झाला. त्यामुळे दोघं पती-पत्नी फोटोसेशनमध्ये गुंग झाले. यावेळी तरुणीने आपले बंदुकीसोबतचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटोसेशन सुरु असताना घात झाला. पती-पत्नी सेल्फी काढत असताना टिगरचं बटन दाबलं गेलं आणि तरुणीच्या गळ्याच्या आरपार गोळी गेली.