देशातील रोहिंग्यांची नोंद करा, हालचालींवर लक्ष ठेवा - केंद्रीय गृहमंत्री

 ज्या राज्यांमध्ये रोहिंग्या आहेत त्यांची गणना करावी, त्यांना एकत्रित करावं आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं असे आदेश राजनाथ सिंग यांनी दिलेत.

Updated: Jul 31, 2018, 08:19 PM IST
देशातील रोहिंग्यांची नोंद करा, हालचालींवर लक्ष ठेवा - केंद्रीय गृहमंत्री title=

नवी दिल्ली : देशात ज्या ज्या राज्यांमध्ये रोहिंग्या आहेत त्यांची गणना करावी, त्यांना एकत्रित करावं आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं असे आदेश राज्यांना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत दिली. रोहिंग्याबाबत लोकसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

याखेरीज बांग्लादेशमध्ये रोहिंग्यांबाबत इन्सानियत मोहिम राबवली जात आहे तशी आपण राबवणार का असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे सुगाटा बोस यांनी उपस्थित केला. यावर केंद्रीय राज्य गृहमंत्री किरण रिजिजू यांनी बोस यांचं विधान दुर्दैवी असून रोहिंग्यांबाबत नरमाईची भूमिका घेणारा भारत हा एकमेव देश असल्याची शक्यता वर्तवली.