नवी दिल्ली : राज्यसभेत आज भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आसामच्या नॅशनल रजिस्टरविषयी केलेल्या एका निवेदनात काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं. काँग्रेसनं आपल्या मताच्या राजकारणासाठी बांग्लादेशी घुसखोरांना मोकळं रान उपलब्ध करून दिल्याचा आरोप यावेळी शाह यांनी केला.
शिवाय राजिस्टर बनवण्याचा पुढाकार काँग्रेसच्या काळात घेण्यात आला. पण तो पूर्ण करण्याची हिंमत त्यांच्या सरकारमध्ये नव्हती. ती हिंमत भाजपच्या सरकारनं दाखवल्याचा दावा अमित शाहांनी केला. त्यावर तृणमूल काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी करून कामकाजात अडथळे आणले. राज्यसभेचं कामकाज गोंधळामुळे वारंवार तहकूब करावं लागलं.