अमूलसोबत बिझनेस करण्याची संधी, महिन्याला होणार ५ ते १० लाखांची कमाई

जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि छोट्या गुंतवणुकीतून महिन्याकाठी चांगले पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 

Updated: Mar 1, 2018, 10:46 AM IST
अमूलसोबत बिझनेस करण्याची संधी, महिन्याला होणार ५ ते १० लाखांची कमाई title=

मुंबई : जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि छोट्या गुंतवणुकीतून महिन्याकाठी चांगले पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 

डेअर प्रॉडक्ट्सची प्रसिद्ध कंपनी अमूलसोबत बिझनेस करण्याची संधी आहे. अमूलची फ्रँचायझी घेणं फायदेशीर ठरु शकते. दरम्यान, याबाबतची सगळी माहिती असणं गरजेचं आहे. या बिझनेससाठी तुमच्याकडे अनुभव असणे गरजेचे नाही तर मार्केंटिंग स्किल हवे. 

अमूलसोबत बिझनेस करणे आहे सोपे

अमूलसोबत बिझनेस करणे सोपे आहे. याची कारणे आहेत ती म्हणजे कस्टमर बेस आणि शहरातील प्रत्येत ठिकाणी अमूलचे नाव. शहरातील अमूलचा कस्टमर बेस चांगला आहे. लोकांना याचे नाव माहीत आहे. यासोबतच छोट्या शहरांमध्येही याचे प्रॉडक्ट्स विकले जातात. त्यामुळे अमूलची फ्रँचायझी घेण्यामध्ये कोणतेही नुकसान नाही.

किती करावी लागेल गुंतवणूक?

अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायझी ऑफर करत आहे. यात तुम्ही अमूलचे आऊटलेट, अमूल रेल्वे पार्लर अथवा अमूल क्योस्कची फ्रँचायझी घेऊ शकता. यासाठी २ लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. यात नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटीच्या नावावर २५ हजार रुपये, रिनोव्हेशनसाठी १ लाख रुपये, इक्विपमेंटसाठी ७५ हजार रुपये खर्च येतो. याची अधिक माहिती फ्रंचायझींच्या पेजवर मिळेल. 

दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये ५ लाखांची गुंतवणूक

जर तुम्हाला अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर चालवायाचे आहे आणि याची फ्रंचायझी घेण्याचा विचार करताय तर यासाठी थोडी अधिक गुंतवणूक करावी लागेल. यासाठी तुम्हाला ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यात ब्रँड सिक्युरिटीसाठी ५० हजार रुपये, रिनोव्हेशन ४ लाख रुपये, इक्विपमेंटसाठी १.५० लाख रुपयांचा समावेश आहे. 

किती होणार कमाई

अमूलच्या मते फ्रंचायझीद्वारे तुम्ही महिन्याला ५ ते १० लाख रुपयांची विक्री होऊ शकते. दरम्यान, ही कमाई तुमच्या आऊटलेटच्या जागेवर अवलंबून आहे. अमूल आऊटलेट सुरु केल्यानंतर कंपनी अमूल प्रॉडक्ट्सच्या मिनिमम सेलिंग प्राइस अर्थात एमआरपीवर कमिशन देते. यात एका मिल्क पाऊचवर २.५ टक्के, मिल्क प्रॉड्क्ट्सवर १० टक्के आणि आईस्क्रीमवर २० टक्के कमिशन मिळते. अमूल आईस्क्रीम स्कूपिंह पार्लरची फ्रँचायझी घेतल्यास रेसिपी बेस् आईस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर ५० टक्के कमिशन मिळते. 

काय आहे फ्रँचायझी घेण्याची अट

तुम्हाला अमूलचे आऊटलेट घ्यायचे असल्यास तुमच्याकडे १५० स्क्वे फूट जागा असणेर गरजेचे आहे. अमूल आईस्क्रीम पार्लरची फ्रँचायझी घेण्यासाठी ३०० स्के फूट जागा असणं गरजेचं आहे.