मुंबई : भारतीय स्टेट बँकेकडून निवृत्त नागरिकांना मोठा दिलासा.
देशातली सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेनं आपल्या मदत ठेवींवरच्या व्याजदरात अर्धा ते पाऊण टक्क्याची वाढ केलीय. या दरवाढीमुळे निवृत्त नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासूनच देशभरात ही व्याजदरवाढ लागू होत आहे.
मोठ्या रकमेच्या दीर्घकालीन ठेवींदारांना या दरवाढीचा विशेष लाभ मिळणार आहे. एक कोटींपेक्षा कमी रकमेच्या सर्व मुदत ठेवींवरचे व्याजदर अर्धा टक्क्यानी वाढवण्यात आले आहेत. तर त्यावरील रकमांचे दर साधारण पाऊण टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान गृहकर्ज आणि वाहनकर्ज महागण्याची चिन्हं यानिमित्तानं स्पष्ट झाली आहेत.