Spicejet विमानात संतापजनक घटना, प्रवाशाने काढले एअर होस्टेसच्या अंडरविअरचे फोटो अन्... पाहा Video

Spicejet Flight Viral Video: स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी घटनेची माहिती देताच दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women) प्रकरण गंभीर्याने घेतलं आहे. त्याचबरोबर नोटीस देखील बजावण्यात आली आहे. 

Updated: Aug 19, 2023, 08:40 PM IST
Spicejet विमानात संतापजनक घटना, प्रवाशाने काढले एअर होस्टेसच्या अंडरविअरचे फोटो अन्... पाहा Video title=
Spicejet air hostess

Spicejet delhi to mumbai flight: सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे हल्ली व्हिडीओ क्षणात व्हायरल (Viral Video) होतात. त्यामुळे अनेक धक्कादायक घटना देखील समोर आल्या आहेत. अशातच फ्लाईटमधील भांडणाचा किंवा इतर घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. त्यातच आता स्पायजेट विमानातील धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली-मुंबई विमान प्रवासात एका वृद्ध प्रवाशाने केबिन क्रूचे आक्षेपार्ह फोटो (Objectionable Photo) काढल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे.

यंदाच्या महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या घटनेची माहिती स्पाईसजेटनं शुक्रवारी दिली आहे. 2 ऑक्टोबरला ही घटना घडल्याचं समोर आलंय. स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी घटनेची माहिती देताच दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women) प्रकरण गंभीर्याने घेतलं आहे. त्याचबरोबर नोटीस देखील बजावण्यात आली आहे. मात्र, फ्लाईटमध्ये नेमकं काय घडलं? पाहुया...

नेमकं काय घडलं?

स्पाईसजेटचे एसजी 157 हे विमान ठरल्याप्रमाणे दिल्लीहून मुंबईला जात होतं. प्रवासी नेहमीप्रमाणे विमान बसले. त्यावेळी पहिल्या रांगेत बसलेला एक वृद्ध प्रवासी टेक ऑफच्या वेळी जम्प सीटवर बसलेल्या महिला केबिन क्रूचे फोटो काढत असल्याचं जाणवलं. याच विमानातून एक मॉडेल प्रवास करत होती. ही मॉडेल त्या वृद्ध व्यक्तीच्या बाजूला बसली होती. त्यावेळी तिने हा सर्व प्रकार पाहिला. फ्लाईट अटेंडंट त्यांना सर्व्ह करत असताना वृद्धाने गुपचूपपणे त्यांच्या मोबाईलमध्ये तिच्या अंडरपँटचे फोटो काढले. हा प्रकार ज्यावेळी केबिन क्रू मेंबरला कळाला, त्यावेळी त्यांनी वृद्धाचा फोन चेक केला. त्यावेळी वृद्धाच्या फोनमध्ये अटेंडंटच्या अंडरपँट्सचे, पायांचे फोटो आणि व्हिडीओ सापडले. त्यातबरोबर मॉडेलचे देखील फोटो आणि व्हिडीओ होते. 

पाहा Video

विमानत सर्वांनी आक्षेप घेतल्यानंतर वृद्ध प्रवाशाने आपली चूक कबूल केली आणि मोबाईलमधील फोटो डिलीट केले आहेत. घडलेल्या प्रकाराबद्दल त्यानं माफी मागितली. वृद्धाने लिखीत स्वरूपात माफी मागितल्याची माहिती स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी दिलीये. या प्रकरणाची माहिती मिळताच दिल्ली महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. महिला आयोगाने दिल्ली पोलीस उपायुक्त आणि डीजीसीएला नोटीस पाठवल्याची माहिती समोर आलीये. तर या प्रकरणी 23 ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.