कावाला गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, एनर्जी अन् एक्सप्रेशन पाहून नेटकरी थक्क; पाहा Video

Jailer Kaavaalaa Song Dance Video Of Little Girl: जेलर चित्रपटातील तमन्ना भाटियाचे कावाला गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिल्स देखील शेअर होताना दिसत आहेत.

Updated: Aug 19, 2023, 05:05 PM IST
कावाला गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, एनर्जी अन् एक्सप्रेशन पाहून नेटकरी थक्क; पाहा Video title=
Kaavaalaa

Little Girl Dance Video: सिनेसृष्टीचा थलायवा म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत  (Rajinikanth) याचा जेलर हा सिनेमा (Jailer Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल आहे. आत्तापर्यंत सिनेमाने 487 कोटींची कमाई केली आहे. तर लवकरच सिनेमा 500 कोटी पार करेल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटातील तमन्ना भाटियाचे कावाला गाणं (Kaavaalaa Song) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिल्स देखील शेअर होताना दिसत आहेत. अशातच आता एका मुलीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. एका चिमुकलीचा हा व्हिडीओ असल्याचं समोर आलंय. नेटकऱ्यांनी देखील व्हिडीओला तुफान प्रतिसाद दिला आहे.

एका मुलीचा एक (Little Girl Dance Video) इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स मूव्ह्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. एवढंच नाही तर चाहते देखील प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. @cutiepie_riva या हँडलने शेअर केलेला व्हिडिओमुळे इंटरनेटवर खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. तमन्ना भाटियाच्या कावाला गाण्याला सुरूवातीपासून प्रतिसाद मिळताना दिसतोय.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aruna Srikanth Vyda (@cutiepie_riva)

तमन्ना भाटियाच्या ‘कावाला’ या तेलुगू गाण्याची खूप क्रेझ पहायला मिळतेय. या गाण्यावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण डान्सचे व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. ‘दिया और बाती’ मालिकेतील अभिनेत्री दीपिका सिंहने देखील या गाण्यावर रील तयार केली होती. त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. तर विजय वर्माने देखील गर्लफ्रेंडच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. त्यामुळे आता या गाण्यावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण डान्सचे व्हिडीओ शूट करून पोस्ट करत आहेत.

आणखी वाचा - Jailer Twitter Review: कार्यालयांना सुट्या, फॅन्सचा कल्ला; रजनीचा आतापर्यंतचा बेस्ट क्लायमॅक्स?

दरम्यान, एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल असताना सुपरस्टार रजनीकांत यांनी गुरुवारी रांची येथील योगदा आश्रमात तासभर ध्यान केलं आणि राजरप्पा मंदिरालाही भेट दिली होती. त्यांच्या या आध्यात्मिक वर्तनाचं सोशल मीडियावर कौतूक होताना दिसलं होतं.