शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होणार!

केंद्र सरकारने अनेक सुविधांसाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, न्यायालयाने आधार कार्ड सक्ती केले जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. आता शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होऊ शकते, तसे संकेत देण्यात आले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 10, 2017, 10:09 AM IST
शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होणार! title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अनेक सुविधांसाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, न्यायालयाने आधार कार्ड सक्ती केले जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. आता शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होऊ शकते, तसे संकेत देण्यात आले आहेत.

केंद्र सरकार आणि सेबी लवकरच शेअर आणि म्युच्युअल फंडासाठी आधार नंबर बंधनकारक करण्याची योजना आखत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार शेअर बाजारात काळा पैसा अधिकृत करण्यासाठी वापर होत असल्याकारणाने हा निर्णय घेण्यात आलाय. काळा पैशाला आळा घालण्यासाठी आधारच्या माध्यमातून प्रयत्न होईल, असे या वृत्तात म्हटलेय.

ईटीने दिलेल्या माहितीनुसार पॅन नंबर अनिवार्य असला तरी काळ्या पैशाच्या व्यवहार बंधन घालू शकत नाही. तसेच असे व्यवहार करणाऱ्यांना अटक करणे शक्य होत नाही. त्यामुळे आधारच्या माध्यमातून चुकीचे व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होईल.

दरम्यान, १ जानेवारीपासून सरकारने पॅन नंबर आणि आधार कार्ड एकमेकांना जोडणे बंधनकारक केलेय. देशात २५ कोटी पॅन कार्डधारक आहेत. तर १११ कोटी जनतेला आधार कार्ड दिली गेली आहेत.