विरोधकांना एकत्र करण्यासाठी सोनिया गांधींनी केलं डिनरचं आयोजन

तिसऱ्या आघाडीसाठी सोनिया गांधी पुन्हा एकदा सक्रीय झाल्या आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 6, 2018, 10:31 PM IST
विरोधकांना एकत्र करण्यासाठी सोनिया गांधींनी केलं डिनरचं आयोजन title=

नवी दिल्ली : तिसऱ्या आघाडीसाठी सोनिया गांधी पुन्हा एकदा सक्रीय झाल्या आहेत.

सोनिया गांधी यांनी १३ मार्चला सर्व विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन केलं आहे. आताच आलेल्या निवडणुकीचे निकाल आणि आगामी निवडणुकांसाठी सोनिया गांधींकडून रणनीती ठरवण्यासाठी आणि सरकारला घेरण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे एनडीएमधील तेलगु देशम पार्टी (टीडीपी) चे नेते देखील या डिनरसाठी सहभागी होऊ शकतात.

सूत्रांच्या माहितीनुसार संसदेत सरकारला घेरण्यासाठी आणि सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी सोनिया गांधी प्रयत्न करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र लढतील यासाठी प्रयत्न होणार आहेत. सोनिया गांधी यांनी ही गोष्ट तेव्हा समोर आणली आहे जेव्हा भाजप आणि काँग्रेस यांच्या शिवाय तिसऱ्या आघाडीची चर्चा होत आहे. याआधी टीआरएसचे प्रमुख आणि तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चन्द्रशेखर राव यांनी याबाबतीत राष्ट्रीय स्तरावर विचार व्हायला हवा असा प्रस्ताव ठेवला होता.