मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून एअर इंडियाने नवी घोषणा केली आहे.
स्त्री शक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जगभरात 8 मार्च दिवशी महिला विमानसेवा सांभाळणार आहेत.
कोलकत्ता - डिमापूर - कोलकत्ता या मार्गावर महिला वैमानिकांनी ही सेवा दिली आहे. flight AI709 आणी एअरबस 319 मध्ये आकांक्षा वर्मा आणि सॅटोविसा बॅनर्जी यांनी कॉकपिट सांभाळले. सोबतच इतर क्रू मेंबर्सदेखील महिला होत्या.
परदेशामध्ये सॅन फ्रान्सिको, न्यूयॉर्क, शिकागो, वॉशिंग्टन डीसी या शहरामध्ये महिला वैमानिक उड्डाणं करणार आहेत. विमानातील इतर जबाबदार्या सांभाळण्यासाठीदेखील महिला कर्मचारी असणार आहेत.