मुंबई : भारतातील आरोग्य व्यवस्था या ना त्या कारणाने समोर आली आहे. आरोग्य व्यवस्था आणि रूग्ण यांच्यातील ताळमेळ अद्याप जुळलेला नाही. काही दिवसांपूर्वी उपचारादरम्यान रूग्णाचा तुटलेला पाय डोक्याखाली देऊन डॉक्टरांनी ऑपरेशन केल्याची घटनासमोर आली होती. तर आता उपाचाराकरता पैसे नसल्यामुळे आईचा पायच कापून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.
अहमदाबादच्या पंचमहाल जिल्ह्यातील राजगढ गावातील गुलाब चौहानने आपल्या आईचा पायच कापल्याची घटना घडली आहे. गुलाब याच्या आईला गँगरीन झाला होता. हा आजार शरीरातील कोणत्याही भागात रक्ताचा पुरवठा न होत असल्यामुळे होतो. यामुळे शरीरातील त्या भागातील पेशी मृत पावतात.
हे गँगरीन शरीरातील इतर भागात पसरू नये म्हणून तो भाग काढला जातो. जेणे करून तो आजार शरीरातील इतर भागात पोहचत नाही. असाच आजार गुलाब यांच्या आईला होता. त्यांच्या आईच्या पायाला गँगरीन झालं होतं. त्यामुळे त्यांच पाय कापण आवश्यक होतं. मात्र त्याच्याजवळ आईच्या पायाचे ऑपरेशन करण्यासाठी आणि इतर उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने नाईलाजामुळे घरीच आपल्या आईचा पाय कापला आहे.
गुलाबने आपल्या दोन बहिणींना मदतीकरता घेतले. त्यासाठी त्याने आवश्यक असलेलं सामान देखील मागवलं. त्यानंतर आपल्या वृद्ध आईला बेडवर झोपवून त्यांचा पाय कापला. यामुळे आता त्यांच्या शरीरातील इतर भागात गँगरीन पोहचणार नाही.