Facebook Profile Tracker: सगळीकडे सध्या काळजी घ्यावी लागते ती सोशल मीडियावर होणाऱ्या नानातऱ्हेच्या गुन्ह्यांची. तेव्हा अशावेळी विशेष काळजी ही घ्यावीच लागते. त्यामुळे अशा गुन्ह्यांचे प्रकार कोणते आणि काय याची माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. एकंदरीत सध्या चर्चा आहे ती Facebook वरील गुन्ह्यांची. त्यातून आता गरजही तशी निर्माण झाली आहे की आपल्यावर कोण लक्ष ठेवून आहे का? आणि असेल तर आपण काय करायला हवं? यावर सगळ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.
कोणतीही अनोळखी व्यक्ती आपल Facebook Profile पाहू शकत नाही याची खात्री करण्यासाठी बरेच लोक त्यांचे Facebook Profile लॉक करून ठेवतात परंतु जेव्हा तुम्ही एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात तेव्हा त्या व्यक्तीशी संबंधित आवश्यक माहिती आपल्याला नसते. तूम्हाला कदाचित कल्पना नसेल पण त्याचे खाते हे संशयास्पदही असू शकते.
कोणाचे Profile हे लॉक असेल तर समोरच्या व्यक्तीला ती कोणी हॅकर आहे की काय अशी शंका उपस्थित होऊ शकते. तेव्हा अशावेळेला काही गेैरसमजही होऊ शकतात हे टाळताही येण्यासारखे आहेत. पुर्वी orkut सह Facebook लाही तूमचं Facebook Profile कोणी पाहिलंच तर त्याची माहिती मिळायची.
Facebook चे आता असे कोणतेही वैशिष्ट्य नाही जे तुम्हाला प्रोफाईल व्हिजिटरची माहिती उपलब्ध करून देईल परंतु एक युक्ती आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे Facebook कोणी स्टॉक केले आहे हे शोधू शकता.
स्टेप-1 Facebook Profile वर जा आणि टाइमलाइनवर क्लिक करा.
स्टेप-2 उजवे क्लिक करा आणि page source निवडा
स्टेप-3 सर्च बॉक्समध्ये InitialChatFriendsList टाइप करा आणि Enter वर क्लिक करा
स्टेप-4 तुमच्या स्क्रीनवर शेकडो आयडींची यादी दिसेल.
स्टेप-५ कोणताही एक आयडी कॉपी करा आणि ब्राउझरमध्ये facebook.com/ID पेस्ट करा आणि एंटर वर क्लिक करा.
स्टेप-6 तुम्ही ब्राउझरमध्ये पेस्ट केलेल्या आयडीची संपूर्ण फेसबुक प्रोफाइल उघडेल. याद्वारे तुमची प्रोफाईल त्या व्यक्तीने पाहिली होती हे तुम्हाला कळू शकेल. अॅपमुळे काम सोपे होईल
तुम्हाला वर नमूद केलेल्या युक्तीपेक्षा सोपी पद्धत अवलंबायची असेल तर तुम्ही प्लेस्टोअरवरून अॅप डाउनलोड करू शकता. प्लेस्टोअरवर प्रोफाइल ट्रॅक करण्यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. अशाप्रकारे ज्यांनी फेसबुक तसेच इन्स्टाग्राम प्रोफाईल पाहिले त्यांच्याबद्दल देखील माहिती मिळवू शकता.