सर्पदंश झालेला नवरा बायकोला चावला... कारण सोबत मरायचं होतं, पण...

उत्तर भारतातील एका माणसाला विषारी साप चावला होता. 

Updated: Jan 4, 2022, 04:56 PM IST
सर्पदंश झालेला नवरा बायकोला चावला... कारण सोबत मरायचं होतं, पण... title=

मुंबई : आज आम्ही जी तुम्हाला कहाणी सांगणार आहोत. ती ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की, ही कोणत्या तरी सिनेमातील आहे. परंतु असे नाही ही कोणत्याही सिनेमातील कहाणी नाही, तर खरी खुरी कहाणी आहे. ही कहाणी उत्तर भारतातील रोमीओ जुलिएटची आहे. ज्यांनी एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती आणि ती पाळली देखील परंतु नशीबात काही वेगळंच लिहिलं होतं.

उत्तर भारतातील एका माणसाला विषारी साप चावला होता. परंतु त्याला त्याच्या बायकोसोबत मरायचे होते म्हणून त्याने तसा प्रयत्न केला. ज्यामुळे नवरा-बायकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण पुढे काही वेगळंच घडलं.

मीडियारिपोर्टनुसार या रोमियोचे नाव शंकर राय आहे. तो शनिवारी रात्री आपल्या घरात झोपला होता. तेव्हा त्याला विषारी सापाने दंश केला. परंतु रात्री त्याला काही कळलं नाही. परंतु सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला जाणवले की, विष संपूर्ण त्याच्या शरीरात भिनलं आहे. ज्यामुळे तो आता जाणार.

तेव्हा त्याने आपल्या मनातील इच्छा पत्नीला सांगितेली. तो म्हणाला की, "मला असं नेहमी वाटायचं आणि ही माझी शेवटी इच्छा आहे की आपण दोघेही एकत्र मरावं." तेव्हा त्याच्या बायकोला त्याचं म्हणणं पटलं आणि तिनं त्याच्यासोबत मरण्यासाठी होकार दिला.

बायकोचा होकार मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या बायकोच्या हाताला चावा घेतला आणि म्हणाला, "या शेवटच्या किस्स नंतर मी मरणार." त्यानंतर ते दोघेही बेशुद्ध झाले.

थोड्या वेळाने त्यांना रुग्णालयात नेले, जिथे रोमियोचा मृत्यू झाला, परंतु ज्युलिएट मात्र वाचली.

यासंपूर्ण प्रकारानंतर जेव्हा बायकोला या प्रकाराबद्दल विचारले गेले. तेव्हा ती म्हणाली, "त्याने मला सांगितले की, त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. त्याने माझे मनगट पकडण्यापूर्वी आणि मला चावा घेण्यापूर्वी सांगितले की मला एकत्र मरायचे आहे आणि मी त्याला परवानगी दिली."

भारताच्या 2018 च्या नॅशनल हेल्थ प्रोफाईलनुसार, 2017 मध्ये देशात साप चावल्यामुळे जवळपास 1 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु जर तुम्हाला कधी साप चावला तर घाबरून जाण्याची गरज नाही. 

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (CDC) पोहायला जाताना किंवा उंच गवतावरून चालताना सापांपासून सावध राहण्याचे सांगतात. जर तुम्हाला साप दिसला तर हळू हळू मागे जा आणि जर एखाद्याला चावा घेतला तर योग्य उपचार होण्यासाठी तुम्हाला कोणता साप चावला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच सापाचा आकार आणि रंग पाहा. तसेच साप चावल्यानंतर शांत राहा, ज्यामुळे विष शरीरात लवकर पसरत नाही.