आता इंटरनेटशिवाय ट्रान्सफर होणार पैसे! ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजुरी

Offline payments India : भारतात अशी अनेक गावे आणि भाग आहेत जिथे आजही इंटरनेट सुविधा नाही. खेडे आणि निमशहरी भागात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी, RBI ने ऑफलाइन डिजिटल पेमेंटसाठी एक फ्रेमवर्क जारी केला. 

Updated: Jan 4, 2022, 12:52 PM IST
आता इंटरनेटशिवाय ट्रान्सफर होणार पैसे! ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजुरी title=

नवी दिल्ली : भारतात अशी अनेक गावे आणि भाग आहेत जिथे आजही इंटरनेट सुविधा नाही. खेडे आणि निमशहरी भागात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी, RBI ने सोमवारी ऑफलाइन डिजिटल पेमेंटसाठी एक फ्रेमवर्क जारी केला. RBI ने डिजिटल पेमेंटला मान्यता दिली आहे.

नियम आणि अटी 

ऑफलाइन पेमेंट अंतर्गत 200 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांना परवानगी आहे. यामध्ये, जास्तीत जास्त 10 व्यवहार म्हणजेच एकूण 2,000 रुपयांपर्यंत ऑफलाइन व्यवहारांना परवानगी असेल. ऑफलाइन डिजिटल पेमेंट म्हणजे ज्यामध्ये इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क आवश्यक नसते. 

AFA आवश्यक नाही

RBIने म्हटले आहे की, अशा व्यवहारांसाठी 'अॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (Additional Factor Authentication AFA)ची आवश्यक नाही. यामध्ये पेमेंट ऑफलाइन होणार असल्याने ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे 'अॅलर्ट' मिळतील.