ब्राझीलीयन तरुणीची छेड काढल्याने मिका सिंगला दुबईत अटक

पोलीस सध्या मिकाची चौकशी करत आहेत.

Updated: Dec 6, 2018, 10:30 PM IST
ब्राझीलीयन तरुणीची छेड काढल्याने मिका सिंगला दुबईत अटक title=

नवी दिल्ली: बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक मिका सिंग याला गुरुवारी दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले. मिका सिंग दुबईत एका कार्यक्रमासाठी गेला आहे. याठिकाणी एका तरुणीने त्याच्याविरोधात छेड काढल्याची तक्रार पोलिसांत केली. यानंतर मिका सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला बूर दुबई पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याठिकाणी चौकशी केल्यानंतर मिकाची रवानगी अबुधाबी येथील कारागृहात करण्यात आलीय.