मुंबई : जिहाद (Jihad) फक्त कुराणात नाही तर गीतेतही (Geeta) आहे. महाभारतातही (Mahabharat) श्रीकृष्णजींनी अर्जुनाला जिहादचा धडा शिकवला होता, असं वादग्रस्त वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांनी केलंय. या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. (shri krishna taught arjuna jihad former home minister shivraj patil chakurkar controversial statement over to geeta at delhi)
"जिहाद फक्त कुराणात नाही, तर गीतेतही आहे. कितीही प्रयत्न करूनही जर कोणाला स्वच्छ विचार कळत नसेल तर शक्तीचा वापर केला पाहिजे. गीतेचा जो भाग महाभारतात आहे, त्यातही जिहाद आहे. महाभारतात श्रीकृष्णजींनी अर्जुनालाही जिहादचा धडा शिकवला होता", असं पाटील म्हणाले. गुरुवारी दिल्लीत पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळेस माजी गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान आता या वक्तव्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.
शिवराज पाटील हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. शिवराज पाटील लातूरचे माजी खासदार राहिले आहेत. पाटील यांनी 1980 पासून अनेकदा केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. मुंबईवर 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा पाटील गृहमंत्री होते. पाटील यांना 2010 मध्ये पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.