Shraddha Walker Case : श्रद्धा वालकर (shraddha walker) हत्या प्रकरणात आफताब पुनावालाने (Aaftab Poonawala) स्वतःचा गुन्हा कबूल केला असला तरी हत्येचं रहस्य कायम आहे. गर्लफ्रेंडचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण झाली आहे. पण पॉलिग्राफ टेस्टमध्ये संपूर्ण हत्येचा कट उघड झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. हत्येचं रहस्य उलगडण्यासाठी नार्को टेस्टकडे पोलिसांची नजर आहे. दिल्ली न्यायालयाने मंगळवारी आफताबची रोहिणी स्थित विधीविज्ञान प्रयोगशाळेत (एफएससी) नार्को चाचणी करण्यास परवानगी दिली. आता 1 डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती आहे. (shraddha walker age)
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, आफताबचे वकील अबिनाश कुमार यांनी सांगितलं आहे की, 'पोलिसांनी एक आणि 5 डिसेंबर रोजी रोहिणी येथील प्रयोगशाळेमध्ये जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली आहे.' त्यामुळे पॉलिग्राफ टेस्ट झाल्यानंतर पोलिसांचं लक्ष नार्को टेस्टकडे आहे. (shraddha walker family)
वाचा | Iran मध्ये मृत्यू तांडव; हिजाबविरोधी निदर्शनांमुळे आतापर्यंत 300 हून अधिक नागरिकांचं निधन
रोहिणी येथील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात एफएसएलचे तज्ज्ञांचे पथक नार्को चाचणी करणार असल्याचं पोलिसांनी यापूर्वी सांगितलं होतं. आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीत काय निष्पन्न झालं आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पॉलिग्राफनंतर नार्को टेस्टच्या माध्यमातून सर्व सत्य समोर येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (shraddha walker latest news)
श्रद्धाची हत्या (shraddha walker story) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही... 'आफताह म्हणाला श्रद्धाच्या हत्या प्रकरणात फाशी झाली तरी हरकत नाही. स्वर्गात गेल्यानंतर मला आणखी अप्सरा भेटतील.' असं देखील आफताब चौकशी दरम्यान म्हणाला.
आफताच्या या गुन्ह्यानंतर संपूर्ण देशात वातावरण तापलं आहे. आफताबला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे आफताबला त्याने केलेल्या गुन्ह्याची कोणतीही खंत नाही. तुरुंगात (Tihar Jail) देखील तो टेन्शन फ्री आयुष्य जगत आहे. (shraddha walkar news latest)
दरम्यान, अद्यापही श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबची कसून चौकशी सुरु आहे. पण आफताब पोलिसांना उटल सुलट उत्तरं देत असल्याचं दिसून आलं आहे. आता त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. (shraddha walker latest news) पण जेलमध्येही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे किंवा तणावाचे कोणतेच भाव दिसून आले नाहीत.