Aftab Amin Poonawalla confession: एक डेटिंग App, एक वेबसीरिज आणि त्यानंतर एका तरुणीची निर्घृण हत्या. त्यात आता लव्ह जिहादचं (Love Jihad) कनेक्शन... हे संपूर्ण प्रकरण आहे मुंबईतल्या श्रद्धा वालकरच्या (Shraddha Walker Murder Case) हत्येचं. आता या हत्या प्रकरणात नवनवे ट्विस्ट येत असताना अखेर हैवाणी आफताबने श्रद्धा वालकरच्या हत्येची कबुली दिली आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) याला आज साकेत न्यायालयात ( Saket Court) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान आफताबने कोर्टात न्यायाधीशांसमोर मोठी कबुली दिली.
श्रद्धा हत्याकांडात (Shraddha Walker Murder Case) दररोज नवनवीन खुलासे होतायत. आफताब पुनावाला हा 4 मोबाईल नंबर वापरत होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येतेय. 4 वेगवेगळे नंबर आफताबकडे आढळून आले आहेत. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवले. फ्रिज मागवण्यासाठी जो नंबर आफताबने वापरला तो श्रद्धाच्या नावावर असल्याची माहितीही समोर येतेय. याचदरम्यान आफताबला साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले आसता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
वाचा: होय! मीच तिला कायमचं संपवलं; आफताबची न्यायालयात कबुली
कोर्टात गुन्हाची कबुली
आरोपी आफताब पूनावाला याने न्यायालयात सांगितले की, ही घटना रागाच्या भरात, काही क्षणात घडली. ही घडलेली घटना आठवण्यात आपल्याला अडचण येत आहे. पण तपासात सहकार्य करत असल्याचेही त्याने न्यायालयाला सांगितले. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha Murder Case) साकेत न्यायालयाने आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीत दिवसांची वाढ केली आहे. विशेष सुनावणीसाठी त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आफताबची आता पॉलीग्राफ टेस्टही केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांना त्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे. आफताब चौकशीत अनेक प्रश्नांची उत्तर चुकीची देतोय. त्यामुळे आफताबची नार्को टेस्ट केली जाणार आहे. पण पॉलिग्राफ (Polygraph) झाल्यानंतरच नार्को टेस्ट करण्यात येते. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी मागितली होती.
हायकोर्टात आफताबने काय दिली कबुली
रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली
घटना लक्षात ठेवण्यास त्रास होत आहे
श्रद्धेचे अवयव कुठे टाकायचे याचा नकाशा बनवला
श्रद्धाची कवटी एका तलावाजवळ फेकली
मी आता पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे
शरीराचे अवयव कुठे फेकले होते, पोलिसांना सांगितले