बापरे! श्वान नव्हे, हा तर चित्ता...; स्वत:च्याच धुंदीत बसलेल्या वॉचमनसमोरून तो गेला आणि....

Pause करुन करुन पाहिला जातोय हा व्हिडीओ

Updated: Jul 27, 2022, 04:13 PM IST
बापरे! श्वान नव्हे, हा तर चित्ता...; स्वत:च्याच धुंदीत बसलेल्या वॉचमनसमोरून तो गेला आणि.... title=
shocking Viral Video panther roams free on the streets of udaipur

उदयपूर: वॉचमन किंवा एखाद्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा रक्षकावरही काहीजणांचा रोष असतो. यांचं लक्षच नसतं, इथपासून येणाऱ्याजाणाऱ्यांना काय आणि किती ते प्रश्न विचारायचे, किती ती नजर ठेवायची इथपर्यंतचे टोमणे या वॉचमन मंडळींना दिले जातात. मुद्दा असा, की ही मंडळी तुमच्याच सुरक्षिततेसाठी तैनात असतात. 

आता हे वॉचमनही माणूसच की. त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष होणं, यात नवल वाटण्याजोगं काहीच नाही. मुद्दा असा की लहानसहान गोष्टीचं ठीक. पण, वॉचमनला चित्ताच दिसला नाही तर? 

बरोबर वाचताय तुम्ही. वॉचमनचं लक्षही नसताना चित्ता अगदी त्याच्या डोळ्यांसमोरूनच चालत जातो आणि काही क्षणांसाठी त्याच्या लक्षातही येत नाही की हा भयंकर वन्यजीव परिसरात घुसखोरी करण्यात यशस्वी ठरलाय. बरं, जेव्हा कळतं तेव्हा उडालेली तारांबळ वेगळीच. 

हा कोणीही रंगवलेला किस्सा नाही, तर ही प्रत्यक्षात घडलेली एक घटना आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चित्ता फाटकातून शांतपणे आत येतोय आणि तिथं असणाऱ्या वॉचमनच्या हे लक्षातही येत नाहीये. 

सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार हा व्हिडीओ उदयपूरमधील असून, प्रताप केंद्राजवळ असणाऱ्या मेवाड हेलिपॅडचा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

व्हिडीओमध्ये येणारा चित्ता पाहण्यासाठी वारंवार नेटकरी तो Pause करुन पाहत आहेत.